१२ वर्षीय मुलाचा १२ तासांत शोध; लकडगंज पोलिसांची तत्पर कारवाई

पोलिसांची युद्धपातळीवर धावपळ; मुलगा सुखरूप पालकांच्या स्वाधीन

    दिनांक :23-Sep-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर,
lakadganj police घरातून बाहेर गेलेला १२ वर्षीय मुलगा अचानक बेपत्ता झाल्यानंतर चिंतेत सापडलेल्या कुटुंबीयांना लकडगंज पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे मोठा दिलासा मिळाला. पोलिसांनी अल्पवयीन मुलाचा अवघ्या १२ तासांत शोध घेऊन त्याला सुखरूप पालकांच्या स्वाधीन केले. मुलगा सुरक्षितपणे परतल्याचे कळताच कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर पुन्हा आनंद परतला.
 

12-year-old boy found within 12 hours by lakadganj police in nagpur 
आझमशहा चौक, बुजाडे मोहल्ला परिसरातील रहिवासी रिप इस्माईल (वय १२) हा मुलगा बेपत्ता झाल्याची माहिती लकडगंज पोलिसांना मिळाली होता. अल्पवयीन मुलगा अचानक बेपत्ता झाल्याने कुटुंबीयांमध्ये मोठी घबराट निर्माण झाली होती. बराच वेळ शोध घेऊनही मुलाचा ठावठिकाणा लागत नसल्याने अखेर कुटुंबीयांनी पोलिसांकडे धाव घेतली. मुलगा अल्पवयीन असल्याने पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून विलंब न करता तपासाची चक्रे वेगाने फिरवली. मुलाचा शोध घेण्यासाठी पोलिस ठाण्यातील तपास पथक (डीबी) तातडीने कामाला लागले. मुलाच्या हालचालींबाबत उपलब्ध माहिती संकलित करण्यात आली. तसेच तो ज्या परिसरात राहत होता, तेथील संभाव्य ठिकाणे आणि त्याच्या संपर्कातील व्यक्तींबाबत माहिती घेऊन शोधमोहीम सुरू करण्यात आली.
 
 
मुलाचा ठावठिकाणा lakadganj police लवकरात लवकर लागावा, यासाठी पोलिस पथकाने विविध ठिकाणी तपास केला. प्रत्येक उपलब्ध माहितीची पडताळणी करून त्यानुसार शोध पुढे नेण्यात आला. मुलगा सुरक्षित आहे की नाही, तो कुठे गेला आहे, याबाबत कुटुंबीयांमध्ये निर्माण झालेली चिंता लक्षात घेऊन पोलिसांनी शोधमोहीम अधिक गतिमान केली. सततच्या प्रयत्नांनंतर पोलिसांना अखेर मुलाचा ठावठिकाणा लागला. बेपत्ता झाल्यापासून अवघ्या १२ तासांत पोलिसांनी मुलाला सुखरूप ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. मुलाला समोर पाहताच कुटुंबीयांचा जीव भांड्यात पडला. काही तासांपासून काळजीत असलेल्या कुटुंबीयांना मुलगा सुखरूप मिळाल्याने मोठा दिलासा मिळाला.
 
पोलिसांनी लगेच हलवली सूत्रे
अल्पवयीन मुलगा बेपत्ता झाल्याची  lakadganj police माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने हालचाली सुरू केल्या आणि वेळ न दवडता शोधमोहीम राबविल्यामुळे मुलाचा सुरक्षित शोध घेणे शक्य झाले. पोलिसांच्या या तत्परतेमुळे कुटुंबीयांनी लकडगंज पोलिसांचे आभार मानले. ही कारवाई पोलिस निरीक्षक मुकुंद कवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दीपक पोकळे, गणेश ठाकूर, मुदस्सीर शेख, विनोद टिकस, कुणाल मसराम आणि सुरज मडावी यांच्या पथकाने केली.