सेवा संकल्प अभियानातून महिला सक्षमीकरणाचा ‘उमेद’दायी अध्याय

स्वयं-सहायता गटांना फिरता निधी व बँक कर्जाचे बळ!

    दिनांक :23-Sep-2026
Total Views |
वाशीम,
seva-sankalp-campaign जिल्ह्यात सध्या राबविल्या जाणार्‍या ‘सेवा संकल्प अभियाना’च्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांच्या आर्थिक व सामाजिक सक्षमीकरणाला मोठी गती मिळाली आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियाना अंतर्गत जिल्ह्यातील १०० टक्के महिलांना स्वयं-सहायता गटांमध्ये संघटित करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येत असून, त्यांना शाश्वत उपजीविकेचे साधन निर्माण करून देण्यासाठी आर्थिक व तांत्रिक पाठबळ दिले जात आहे. महिलांना आर्थिकष्ट्या सक्षम करण्यासाठी या मोहिमेअंतर्गत त्रिस्तरीय आर्थिक सहाय्य पुरवले जात आहे.
 
 
seva-sankalp-campaign
 
स्वयं-सहायता गटांचे अंतर्गत व्यवहार आणि आर्थिक शिस्त बळकट करण्यासाठी फिरता निधी दिला जात आहे. व्यवसाय व उद्योगाच्या विस्तारासाठी बँकांमार्फत सुलभ व थेट कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. नवीन उद्योग आणि शेतीपूरक व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक उपजीविका निधीची जोड दिली जात आहे. केवळ निधी देऊन न थांबता महिला गटांना योग्य उद्योगांची निवड, व्यवसाय व्यवस्थापन आणि बाजारपेठेशी जोडण्यासाठी आवश्यक ते मार्गदर्शन व सहाय्य पुरवण्यावर भर दिला जात आहे. यामुळे ग्रामीण भागातील महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहून शाश्वत उत्पन्न मिळवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सेवा संकल्प अभियानाचा लाभ शेवटच्या घटकातील महिलेपर्यंत पोहोचावा, यासाठी ’उमेद प्रशासकीय यंत्रणा सक्रिय झाली आहे.
 
 
तळागाळातील महिलांपर्यंत विविध शासकीय योजना, निधी व कर्जप्रकरणांची माहिती पोहोचवून त्यांना लाभ मिळवून देण्यासाठी समन्वयाने कार्यवाही केली जात आहे. सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून महिलांना संघटित करून त्यांना रोजगाराच्या व उद्योजकतेच्या संधी उपलब्ध करून देणे, हाच या मोहिमेचा मुख्य ध्यास आहे.