टी-२० क्रमवारीत अभिषेकची झेप!

    दिनांक :23-Sep-2026
Total Views |
नवी दिल्ली,
t20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने भारत आणि जपान यांच्यातील टी-२० सामन्यानंतर ताजी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रमवारी जाहीर केली असून, त्यात भारतीय फलंदाजांचा दबदबा कायम आहे. इशान किशनने ९०४ गुणांसह अव्वल स्थान टिकवून ठेवले आहे. त्याचवेळी सलामीवीर अभिषेक शर्माने ८९३ गुणांसह दुसरे स्थान कायम राखत अव्वल क्रमांकाच्या इशानच्या जवळ पोहोचला आहे. त्यामुळे आगामी सामन्यांमध्ये या दोन्ही भारतीय फलंदाजांमध्ये पहिल्या क्रमांकासाठी चुरस पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
 
 
t20
 
पाकिस्तानचा साहिबजादा फरहान ८४८ गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूकने मात्र क्रमवारीत मोठी झेप घेतली असून, पाच स्थानांची प्रगती करत तो ७९३ गुणांसह चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. इंग्लंडच्या जोस बटलरलाही दोन स्थानांचा फायदा झाला असून, ७८९ गुणांसह त्याने पाचवे स्थान मिळवले आहे. त्यामुळे ताज्या क्रमवारीत इंग्लंडच्या दोन्ही फलंदाजांची स्थिती सुधारली आहे.
 
भारताच्या तिलक वर्माला मात्र क्रमवारीत एका स्थानाचा फटका बसला आहे. ७२६ गुणांसह तो नवव्या क्रमांकावर घसरला आहे. दहाव्या स्थानावर ऑस्ट्रेलियाचा मिचेल मार्श ७०६ गुणांसह आहे. त्यामुळे तिलक वर्माची अव्वल दहामधील जागा धोक्यात आली आहे. सध्याच्या क्रमवारीतील अव्वल दहामध्ये इशान किशन, अभिषेक शर्मा आणि तिलक वर्मा असे तीन भारतीय फलंदाज आहेत. दरम्यान, जपानविरुद्धच्या टी-२० सामन्यातील विजयामुळे भारतीय संघाने क्रमवारीत अव्वल स्थानही मिळवले असून, यापूर्वी हे स्थान इंग्लंडकडे होते.