अकोला जिल्ह्यात डॉल्बी, डीजेला १ नोव्हेंबर पर्यंत बंदी

उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार जिल्हाधिकाऱ्यांची अधिसूचना

    दिनांक :23-Sep-2026
Total Views |
अकोला,
Ban on Dolby and DJ systems in Akola सण उत्सवांच्या काळात होणारे ध्वनी प्रदूषण आणि उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात डॉल्बी, डीजे, टॉप मिड-बास स्वरूपाची व अति तीव्र ध्वनी निर्माण करणाऱ्या दोन्ही यंत्राचा वापर करण्यावर बंदी घालण्यात आली असून यांसदर्भात जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी मंगळवार,२२ रोजी आदेश जारी केले. संबंधित आदेश हे ११ सप्टेंबर २०२६ ते १ नोव्हेंबर २०२६ रात्री १२ वाजेपर्यंत लागू राहतील.आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध लागू कायदे व नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 
 
 

dolbi  
 
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात डीजेसह अति तीव्र ध्वनी निर्माण करणाऱ्या यंत्रासंदर्भात दाखल जनहित याचिकेमध्ये ११ सप्टेंबर २०२६ रोजी आदेश पारित करण्यात आला असून १६ सप्टेंबर २०२६ रोजी न्यायालयाने ध्वनी प्रदूषणात प्रतिबंध करण्याबाबत आवश्यक निर्देश दिले आहेत. त्यानुसार उत्सव धार्मिक कार्यक्रम, आगमन-विसर्जन मिरवणुका तसेच इतर सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये डॉल्बी, डीजे सह अतिउच्च ध्वनीचा वापर करण्यावर मनाई घालण्यात आली आहे. अति तीव्र ध्वनीमुळे नागरिकांच्या आरोग्य सुरक्षितता व सार्वजनिक शांततेवर प्रतिकूल परिणाम होण्याची तसेच नागरिकांच्या तक्रारी, वादविवाद व कायदा सुव्यवस्था परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यानुसार पोलीस अधीक्षक सर्व उपविभागीय दंडाधिकारी, तहसीलदार व संबंधित पोलीस अधिकारी यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करून त्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात नमूद आहे.
 
 
 
काय आहे आदेशात?
 
  • -जिल्ह्यातील कोणत्याही आगमन- विसर्जन अथवा इतर सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये डॉल्बी, डीजे, टॉप मिड-बास स्वरूपाची बहुविध ध्वनीक्षेपक यंत्रणा अथवा तत्सम अति तीव्र ध्वनी निर्माण करणाऱ्या दोन्ही यंत्राचा वापर करता येणार नाही.
  • - ध्वनी यंत्रणा बसवण्यासाठी अथवा वाहून नेण्यासाठी अनधिकृत मॉडीफाय केलेल्या वाहनाचा मिरवणूक किंवा सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये वापर करता येणार नाही.
  • -व्यक्ती, संस्था, मंडळ, मिरवणूक आयोजक, ध्वनि यंत्रणा मालक, चालक, ऑपरेटर किंवा सार्वजनिक कार्यक्रम आयोजक यांनी प्रतिबंधित कृती करू नये.
  • - लागू असलेले कायदे, नियम सक्षम प्राधिकार्‍याच्या परवानग्या व ध्वनी मर्यादांच्या अधीन राहून परवानगी योग्य ध्वनी व्यवस्थेचा वापर असल्यास त्यावर संबंधित कायदे व नियमानुसार स्वातंत्रपणे कार्यवाही करण्यात येईल.
  • -संबंधित आदेश हे ११ सप्टेंबर २०२६ ते १ नोव्हेंबर २०२६ रात्री १२ वाजेपर्यंत लागू राहतील.आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध लागू कायदे व नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल.