लोणार शहरात महावितरणचा ‘अंधेर नगरी’ कारभार; ऐन सणासुदीत नागरिक आणि व्यापारी वेठीस!

काँग्रेसचा आदोलनाचा इशारा

    दिनांक :23-Sep-2026
Total Views |
लोणार,
congress-warns-of-agitation शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे नागरिक आणि व्यापारी वर्ग कमालीचा त्रस्त झाला आहे. आगामी गणेशोत्सव, नवरात्र, दसरा, दिवाळी या सणांच्या पार्श्वभूमीवर आणि जैन समाजाचा पवित्र चातुर्मास सुरू असतानाच महावितरणच्या या ढिसाळ कारभारामुळे जनतेमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. या गंभीर समस्येवर तातडीने उपाययोजना करून शहरासह गावठाण परिसरातील वीजपुरवठा पूर्ववत करावा, अन्यथा काँग्रेस कमिटीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा एका निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
 
 
congress-warns-of-agitation
 
लोणार नगरपरिषदेमार्फत शहराला होणारा पाणीपुरवठा हा पूर्णपणे विद्युत यंत्रणेवर अवलंबून आहे. वीज वारंवार गुल होत असल्याने पाणी उपसा ठप्प होऊन शहरात विस्कळीत पाणीपुरवठ्याचे मोठे संकट उभे ठाकले आहे. दुसरीकडे, ऐन सणासुदीच्या काळात बाजारपेठेत तेजी असताना 'गावठाण फीडर' भागातील वीज गायब होत असल्याने व्यापारी बांधवांना मोठ्या आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागत आहे.या पार्श्वभूमीवर, महावितरणने तांत्रिक बिघाड तात्काळ दूर करून अखंडित वीजपुरवठा सुरू करावा, अशी जोरदार मागणी नागरिकांमधून होत आहे. वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास होणाऱ्या आंदोलनाची संपूर्ण जबाबदारी संबंधित वीज वितरण कार्यालयाची राहील, असेही या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. या निवेदनात काँग्रेसचे नेते राजेश मापारी, माझी नगराध्यक्ष भूषण मापारी,तालुका अध्यक्ष लक्ष्मण फुके,शहर अध्यक्ष शेख समद,न. पा उपाध्यक्ष आबेद खान, माझी शहरअध्यक्ष नितीन शिंदे, नगरसेवक अब्दुल उबेद, संतोष मापारी,पंढरी चाटे,जमील कुरेशी,शेख रऊफ शेख महेबुब, रमजान परसुवाले, साहेबराव पाटोळे,विलास मोरे, आदी काँग्रेस कार्यकर्त्यांनी स्वाक्षरी करत निवेदन दिले