वीज पडून शेतकर्‍याचा मृत्यू

जिल्ह्यात अनेक भागात अवकाळी पाऊस

    दिनांक :23-Sep-2026
Total Views |
वाशीम,
farmer-diesवाशीम जिल्ह्यात २३ सप्टेंबर रोजी अवकाळी पावसाने हजेरी लावली. अशातच मंगरुळनाथ तालुयातील तांदळी येथे बुधवार, २३ सप्टेंबर रोजी शेतात सोयाबीन कापणीचे काम सुरू असताना अचानक वीज कोसळून राहुल विष्णू राठोड (वय ३०) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
 
 
dies
 
राहुल राठोड हे शेतात सोयाबीन कापणीचे काम करीत होते. यावेळी अचानक वीज कोसळल्याने ही दुर्दैवी घटना घडली. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. राहुल यांच्या पश्चात वडील विष्णू राठोड, आई उषा राठोड व भाऊ मंगेश राठोड असा परिवार आहे. कुटुंबातील कर्त्या मुलाचा अचानक मृत्यू झाल्याने राठोड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनेमुळे तांदळी परिसरात हळहळ व्यक्त होत असून प्रशासनाकडून घटनेचा पंचनामा व आवश्यक कार्यवाही करण्यात येत आहे.
 
 
शासनाने नैसर्गिक आपत्तीअंतर्गत राठोड कुटुंबीयांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
२३ सप्टेंबर रोजी दुपारी विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. वाशीम जिल्ह्यातील अनेक भागात जोरदार पाऊस पडला. मंगरुळनाथ तालुयातही अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडला. अशातच शेतात सोयाबीन कापणीचे काम करत असतांना वीज पडून राहुल राठोड यांचा दुदैवी मृत्यू झाला.
छायाचित्र - राहुल राठोड