लोणार,
lonar तालुका कोरडा दुष्काळग्रस्त जाहीर करावा, या प्रमुख मागणीसाठी आज शेतकऱ्यांनी लोणार तालुका तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढला. हातात नुकसानग्रस्त सोयाबीनची झाडे घेऊन संतप्त शेतकरी मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले. या मोर्चाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे शेतकऱ्यांच्या मुलांनी पुढाकार घेत मोर्चाचे नियोजन केले होते. प्रत्येक गावातून शेतकऱ्यांना मोर्चात सहभागी करून घेण्यासाठी वाहनांची व्यवस्था करण्यापासून ते शेतकऱ्यांना एकत्रित करण्यापर्यंतचे नियोजन करण्यात आले.
त्यामुळे तालुक्यातील विविध गावांमधून शेतकरी मोठ्या संख्येने लोणारमध्ये दाखल झाले. आंदोलकांच्या दाव्यानुसार, हा तालुक्याच्या इतिहासातील सर्वात मोठा शेतकरी मोर्चा ठरला आहे. पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे खरीप हंगामातील पिकांवर संकट ओढावल्याचे चित्र लोणार तालुक्यात पाहायला मिळत आहे. विशेषतः सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाल्याचा दावा शेतकऱ्यांकडून केला जात आहे. करपलेली आणि नुकसानग्रस्त सोयाबीनची झाडे हातात घेऊन शेतकरी लोणार तालुका तहसील कार्यालयावर धडकले. या मोर्चामागे आणखी एक वेगळी गोष्ट पाहायला मिळाली.
शेतकऱ्यांच्या मुलांनीच मोर्चाचे नियोजन करण्यासाठी पुढाकार घेतला होता. गावागावातील शेतकऱ्यांशी संपर्क साधणे, त्यांना मोर्चात सहभागी होण्यासाठी आवाहन करणे आणि प्रत्येक गावातून शेतकऱ्यांना लोणारपर्यंत आणण्यासाठी वाहनांची व्यवस्था करणे, असे नियोजन करण्यात आले होते. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी त्यांच्या मुलांनी घेतलेला हा पुढाकार मोर्चाचे विशेष आकर्षण ठरला. मोर्चात सहभागी शेतकऱ्यांनी लोणार तालुका कोरडा दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची प्रमुख मागणी केली. तसेच पिकांच्या नुकसानीपोटी हेक्टरी ५० हजार रुपये नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. याशिवाय शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव मिळावा आणि कृषी पंपांसाठी २४ तास वीजपुरवठा करण्यात यावा, अशा मागण्या प्रशासनासमोर मांडण्यात आल्या.
शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या :
🔹 लोणार तालुका कोरडा दुष्काळग्रस्त जाहीर करावा.
🔹 पिकांच्या नुकसानीपोटी हेक्टरी ५० हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी.
🔹 शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव द्यावा.
🔹 कृषी पंपांसाठी २४ तास वीजपुरवठा करावा.
🔹 नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी.
लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांनी आज मोठ्या संख्येने एकत्र येत लोणार तालुका तहसील कार्यालयावर धडक दिली. विशेष म्हणजे या मोर्चाचे नियोजन शेतकऱ्यांच्या मुलांनी केले होते. गावागावातील शेतकऱ्यांशी संपर्क साधून त्यांना मोर्चात सहभागी करून घेण्यात आले, तर प्रत्येक गावातून शेतकऱ्यांना लोणारपर्यंत आणण्यासाठी वाहनांचीही व्यवस्था करण्यात आली. हातात नुकसानग्रस्त सोयाबीनची झाडे घेऊन शेतकऱ्यांनी लोणार तालुका कोरडा दुष्काळग्रस्त जाहीर करावा, हेक्टरी ५० हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी, उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव द्यावा आणि कृषी पंपांना २४ तास वीजपुरवठा करावा, अशा मागण्या प्रशासनासमोर मांडल्या.