बँक ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी...२८ ते ३० सप्टेंबर बँकेचा संप

    दिनांक :23-Sep-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Important news for bank customers बँक युनियन्सच्या २८ ते ३० सप्टेंबर २०२६ दरम्यान पुकारलेल्या राष्ट्रव्यापी संपावर कामगार संघटना ठाम आहेत. ५-डे बँकिंगची मागणी आणि पीएलआय (PLI) योजना रद्द करण्याच्या मुद्यावर सरकारकडून कोणतीही ठोस प्रगती न झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. शुक्रवारनंतर शनिवार, रविवार आणि संपाचे दिवस मिळून बँक शाखा सलग ५ दिवस बंद राहण्याची शक्यता आहे.या संपामुळे बँक शाखांमधील रोख व्यवहारांवर मोठा परिणाम होणार आहे. एसबीआय (SBI) आणि कॅनरा बँकेसह प्रमुख बँकांनी ग्राहकांना संपापूर्वीच महत्त्वाची कामे आटोपून घेण्याचे आवाहन केले आहे.
 
 
 
bnak
 
मात्र, ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी एटीएम (ATM), एडीडब्ल्यूएम (ADWM) आणि बीएनए (BNA) सारख्या सुविधा सुरळीत सुरू राहतील, ज्यामुळे रोख पैशांची अडचण भासणार नाही. सर्वात दिलासादायक बाब म्हणजे, या संपामुळे यूपीआय (UPI), मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग आणि योने (YONO) यांसारख्या डिजिटल सेवांवर कोणताही परिणाम होणार नाही. वित्त मंत्रालयाने कर्मचाऱ्यांना संप मागे घेऊन चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढण्याचे आवाहन केले असून, ग्राहकांनी ऑनलाइन पर्यायांचा वापर करण्याचे सुचवले आहे.