जपानला चक्रीवादळचा फटका

१८ नागरिकांचा मृत्यू; मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत

    दिनांक :23-Sep-2026
Total Views |
टोकियो,
japan-hit-by-cyclone लुजिन चक्रीवादळाने जपानमध्ये हाहाकार माजवला असून, पूर आणि भूस्खलनामुळे १८ नागरिकांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी आहेत. अनेक नागरी भागांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने हजारो नागरिकांना स्थलांतरित व्हावे लागले. टोकियोजवळील अनेक भागांमध्ये वाहतूक आणि वीजपुरवठा विस्कळीत झाला आहे. मृत आणि बेपत्ता लोक कानागावा आणि चिबा प्रांतांतील आहे.
 
japan-hit-by-cyclone
 
जपानच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले की, वादळाचा सर्वाधिक फटका कानागावा आणि चिबा प्रांताला बसला आहे. अनेक वस्त्या पाण्याखाली गेल्या असून अनेक घरे उद्ध्वस्त झाली आहेत. अनेक लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती आहे. दोन्ही प्रांतांतील अधिकाऱ्यांनी बेपत्ता लोकांचा शोध घेण्यासाठी जपानच्या संरक्षण दलाकडे मदतीची विनंती केली आहे. बचाव पथकाने आतापर्यंत १८ नागरिकांचे मृतदेह ताब्यात घेतले आहे, तर सहा बेपत्ता लोकांचा शोध सुरू आहे. ढिगारे उपसण्याचे काम सुरू असून, मृतकांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. अनेक भागातील वीजपुरवठा आणि वाहतूक विस्कळीत झाली आहे. पुलावरून पुराचे पाणी वाहत असल्याने महामार्ग बंद करण्यात आले. पूरग्रस्त भागातून हजारो नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येत आहे.
मेक्सिकोपर्यंत व्याप्ती
मेक्सिकोच्या किनारपट्टीवर धडकलले चक्रीवादळाची व्याप्ती जपानपर्यंत पोहोचली आहे. यूएस नॅशनल हरिकेन सेंटरनुसार, चक्रीवादळ आता श्रेणी पाचमध्ये रूपांतरित झाले आहे, जे सॅफिर-सिम्पसन स्केलवरील सर्वात धोकादायक चक्रीवादळ आहे. वादळाच्या केंद्रातील वाऱ्याचा वेग ताशी सुमारे २६० किलोमीटरपर्यंत आहे, ज्यामुळे किनारपट्टीच्या भागात पूर आणि भूस्खलनाचा गंभीर धोका आहे. वादळ किनारपट्टीच्या जवळ असल्यामुळे नुकसानीच्या नेमक्या व्याप्तीचा अंदाज लावणे खूप घाईचे ठरेल, कारण वाऱ्याचा वेग आणखी वाढू शकतो.