नागपूर,
dilip-wate विज्ञान भारती विदर्भ प्रदेश मंडळ आणि इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्स, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘विज्ञान संस्कृती संगम’ व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानमालेअंतर्गत बुधवार, २३ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्सच्या सभागृहात दिलीप वाटे यांचे ‘हस्त मुद्रा : प्राचीन ज्ञान ते आधुनिक न्यूरो सायन्स : एक वैज्ञानिक प्रचिती’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
या व्याख्यानाचा वैज्ञानिक, शिक्षक, डॉक्टर, अभियंते, विद्यार्थी, माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील कर्मचारी तसेच ज्येष्ठ नागरिकांनी आवर्जून लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. हस्तमुद्रांविषयीचे प्राचीन ज्ञान आणि आधुनिक न्यूरो सायन्स यांचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून संबंध या व्याख्यानातून समजून घेता येणार आहे. दिलीप वाटे हे व्हीआरसीईचे माजी विद्यार्थी असून, त्यांनी कॉर्पोरेट क्षेत्रात विविध महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. गेल्या २०२० पासून ते या विषयावर संशोधन करत आहेत.
सौजन्य: नरेश चाफेकर, संपर्क मित्र