मराठवाड्यात १९७२नंतरचा भीषण दुष्काळ

दोन दिवसांत दुष्काळाचा जीआर, सरसकट मदतीची मुख्यमंत्र्यांची घोषणा

    दिनांक :23-Sep-2026
Total Views |
लातूर
cm devendra fadnavis मराठवाड्यात निर्माण झालेली दुष्काळाची परिस्थिती अत्यंत गंभीर असून, १९७२नंतर प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर दुष्काळाचा सामना करावा लागत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी सांगितले. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, येत्या दोन दिवसांत दुष्काळ जाहीर करण्याचा शासन निर्णय (जीआर) काढण्यात येईल. नुकसान सरसकट झाले असल्याने मदतही सरसकट करण्यात येईल, अशी घोषणा फडणवीस यांनी केली.
 

marathwada drought cm devendra fadnavis announces blanket aid for drought-hit farmers 
मुख्यमंत्री फडणवीस सध्या लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून, औसा आणि निलंगा परिसरात त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधत परिस्थितीची माहिती घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली.मराठवाड्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मागील काळात पावसाचे प्रमाण ६४ टक्के होते, तर यंदा ते सुमारे ५० टक्क्यांवर आले आहे. या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांसमोर मोठे संकट निर्माण झाले असून, रब्बी हंगामातील पिके घेणे शक्य झाल्यास त्यासाठीही शासनाकडून मदत केली जाईल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
 
 
नुकसानीचे पंचनामे सुरू cm devendra fadnavis  आहेत. कायद्यातील तरतुदीनुसार पंचनामे करणे आवश्यक असल्याने ही प्रक्रिया केली जात आहे; मात्र पंचनाम्यांपुरते सरकार थांबणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. नुकसान मोठ्या प्रमाणावर आणि सरसकट झाले असल्याने मदतही सरसकट देण्याची भूमिका शासनाने घेतली आहे. दुष्काळाच्या मदतीची रक्कम शक्य तितक्या लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.दुष्काळाच्या संकटाला सामोरे जाण्यासाठी जलसंधारणाची कामे हाती घेतली जाणार असून, त्यातून रोजगारनिर्मितीलाही चालना देण्यात येईल. पुढील तीन ते चार महिने आव्हानात्मक असतील, त्यामुळे या काळात एकमेकांना सहकार्य करत संकटातून मार्ग काढण्याचे आवाहन फडणवीस यांनी केले.
 
 
शेतकऱ्यांना धीर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, या संकटात  cm devendra fadnavis  ते एकटे नाहीत आणि सरकार पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठीशी आहे. मदत देताना कोणतीही कसर ठेवली जाणार नाही. कर्जमाफीची प्रक्रिया अद्याप सुरू असून, ती पूर्ण होईपर्यंत शासनाचे प्रयत्न सुरूच राहतील. कर्जमाफीची रक्कमही शेतकऱ्यांना दिली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.शेतकऱ्यांच्या जुन्या वीजबिलांबाबतही मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाची माहिती दिली. सुमारे ४८ हजार कोटी रुपयांचे जुने वीजबिल माफ करण्यात आले असून, ही रक्कम भविष्यात पुन्हा वसूल केली जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले.मराठवाड्यातील दुष्काळाचा सर्वाधिक परिणाम लातूर जिल्ह्यावर झाल्याचे फडणवीस यांनी नमूद केले. परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी शासनाने चारा आणि पाण्याचे नियोजन केले आहे. कोल्हापूर आणि सांगली येथून पाणी आणण्याचे नियोजन करण्यात आले असून, आवश्यक ती सर्व मदत करण्याची तयारी शासनाने ठेवली आहे. दुष्काळग्रस्तांना आर्थिक मदतही दिली जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.दरम्यान, मदत तत्काळ मिळावी अशी शेतकऱ्यांची अपेक्षा असली तरी प्रशासकीय प्रक्रियेमुळे काही वेळ लागत असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले. पंचनामे कायदेशीर प्रक्रियेच