मोबाईल रिचार्जसाठी नवा नियम...

कॉलिंग अन् SMS च्या Recharge चा खर्च थेट अर्ध्यावर!

    दिनांक :23-Sep-2026
Total Views |
मुंबई,
Mobile Reacharg Planeभारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने रिचार्जचे पर्याय वाढवण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलले आहे. मंगळवारी, ट्रायने दूरसंचार ग्राहक संरक्षण नियम, २०२६ जारी केले. याअंतर्गत, दूरसंचार कंपन्यांना अल्प-मुदतीचे विशेष दर व्हाउचर देणे बंधनकारक असेल, जे केवळ व्हॉइस कॉलिंग आणि एसएमएस सेवा देतील. ट्रायने कमी उत्पन्न असलेल्या मोबाईल ग्राहकांना लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे.
 
 
techno
दूरसंचार विभागाने जारी केलेल्या निवेदनानुसार, दूरसंचार कंपन्यांना ३० दिवस किंवा त्यापेक्षा कमी वैधतेचे व्हॉइस आणि एसएमएससाठी एसटीव्ही देणे बंधनकारक असेल. याचा अर्थ असा की, ज्या ग्राहकांना प्रामुख्याने कॉलिंग आणि एसएमएसची गरज आहे, त्यांना महागड्या दीर्घ-मुदतीच्या योजना खरेदी करण्यास भाग पाडले जाणार नाही. याव्यतिरिक्त, कंपन्यांना असे एसटीव्ही देणे देखील बंधनकारक असेल, जे ग्राहक दर महिन्याला त्याच तारखेला नूतनीकरण करू शकतील. जर एखाद्या विशिष्ट महिन्यात ती तारीख उपलब्ध नसेल, तर त्या महिन्याच्या शेवटच्या तारखेला रिन्यूअल करता येईल.