नागपूर,
Nagpur Encroachmentनागपूर महानगरपालिका, धरमपेठ झोन क्र. ०२, अंतर्गत दि: 21सप्टेंबर रोजी केलेल्या अतिक्रमण कारवाई VNIT रोड आणि सीताबर्डी पर्यंत धरमपेठ झोन अंतर्गत या ठिकाणी कारवाई करण्यात आली.आज घेतलेल्या एका मोठ्या अतिक्रमण विरोधी कारवाईत सार्वजनिक पदपथांवर बेकायदेशीर ताबा मिळवणाऱ्या विक्रेत्यांवर प्रशासनाने कडक कारवाई केली.
पदपथांवर अनधिकृतपणे हातगाड्या लावून पादचाऱ्यांच्या मार्गात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी ८ विक्रेत्यांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी पदपथ मोकळे ठेवणे आवश्यक असून, नियम मोडणाऱ्यांवर अशीच कठोर कारवाई पुढेही सुरू राहील, असा इशारा अधिकाऱ्यांनी दिला आहे. पदपथ सुरक्षित व वाहतुकीसाठी मोकळे ठेवण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.