बुलढाणा
nagpur-pact-bonfire विदर्भातील ११ जिल्ह्यातील व १२० तालुक्यातील काही गावात व शहरात विदर्भाच्या मागणीचा वणवा पेटविण्याच्या हेतूने जनजागरणाचाच एक भाग म्हणून विदर्भ निर्माण जनसंकल्प मेेळाव्याची मालिका सुरु केली आहे. दि. २८ सप्टेंबर १९५३ रोजी केलेल्या नागपूर करारातील अटीची पुर्तता न झाल्यामुळे विदर्भावर अन्यायाची मालिका सतत सुरु राहिली म्हणून नागपूर करार फसवा निघाल्यामुळे तो कुचकामी झाल्यामुळे १२० तालुक्यात २८ सप्टेंबर रोजी नागपूर करार होळी आंदोलन करण्याचा निणर्य विदर्भ राज्य आंदोलन समिती यानी केला असून आंदोलनापूर्वी भारतीय स्वातंत्र्य लढयातील महापुरुषांच्या पुतळ्यासमोर नागपूर कराराची होळी आंदोलन छेडणार अशी माहिती पत्रकार परिषदेत माजी आ. वामनराव चटप यांनी दिली आहे.
दि. २३ सप्टेंबर रोजी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने पत्रकार भवन येथे पत्रकार परिषद घेण्यात आली यावेळी अध्यक्ष अॅड. वामनराव चटप, डॉ. पी. आर. राजपूत, अॅड. सुरेश वानखेडे, शंकरराव पारे, शिवाजीराव जाधव, दामोदर शर्मा, रामदास शिंगणे, तेजराव मुडे, डॉ. राम बारोटे, प्रा. दिलीप नाईकवाडे, कैलास लाटे उपस्थित होते.
दि. २६ ऑक्टोबर रोजी अकोला जिल्हास्थळी विदर्भ निर्माण जनसंकल्प मेळाव्याचे प्रमिलाताई टोपले सभागृहात आयोजन केले असून अकोला जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील व पश्चिम विदर्भातील सर्व जिल्ह्यातील विदर्भवादी जनतेने या मेळाव्यात मोठ्या संख्येने सहभागी होऊन आंदोलनाची तिव्रता वाढत असल्याचा प्रत्यय केंद्र सरकारला दाखवून द्यावा व मेळावा यशस्वी करावा असे आवाहन विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष वामनराव चटप यांनी पत्रकार परिषदेतून केले.