मालेगाव,
digambar-jain-community शिरपूर येथील अंतरिक्ष पार्श्वनाथ तीर्थक्षेत्रातील भगवान मुनिसुव्रतनाथ स्वामी यांच्या मूर्तीला बाधा आणून मूर्तीभंजन व विटंबना केल्याच्या आरोपाच्या निषेधार्थ मालेगावातील सकल दिगंबर जैन समाजाच्या महिला मंडळ व नवयुवक मंडळाच्या वतीने दि.२१ सप्टेंबर सोमवार रोजी तहसीलदार कार्यालय तसेच मालेगाव पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले या गंभीर घटनेची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली दि. १९ सप्टेंबर रोजी शिरपूर येथे घडलेल्या प्रकारात भगवान मुनिसुव्रतनाथ स्वामी यांच्या संगमरवरी मूर्तीचा डावा कान तोडून मूर्ती खंडित करण्यात आल्याचा दावा निवेदनातून करण्यात आला आहे.

धार्मिक स्थळातील अशा प्रकारामुळे समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या असून, घटनेमागील सत्य तातडीने तपासातून समोर आणावे, अशी मागणी समाजाच्या वतीने करण्यात आली घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तातडीने सुरक्षित करावे, मूर्तीची न्यायवैद्यक (फॉरेन्सिक) तपासणी करावी, घटनास्थळाचा पंचनामा करावा आणि संबंधित दोषींवर भारतीय न्याय संहितेनुसार (इछड) गुन्हा दाखल करून अटक करावी, अशी ठोस मागणी निवेदनात करण्यात आली आहे. तसेच मंदिर परिसरातील सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करून सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित ठेवावी,अशी मागणीही करण्यात आली धार्मिक विषय संवेदनशील असल्याने कोणत्याही अफवांना वाव न देता प्रशासनाने निष्पक्ष चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे, अशी भूमिका सकल मालेगाव येथील सकल दिगंबर जैन समाज महिला मंडळ नवयुवक मंडळ व दिगंबर जैन समाजाने मांडली असून निवेदनावर स्वाक्षरी महिला व नवयुवक मंडळ तसंच सकल दिगंबर जैन समाजाचे घटक त्या निवेदन देते वेळेस उपस्थित होते.