जिप सीईओ यांनी हातात झाडू घेत केली ग्रामस्वच्छता

    दिनांक :23-Sep-2026
Total Views |
वाशीम,
zilla-parishad-ceo सेवा संकल्प अभियान आणि स्वच्छता ही सेवा अंतर्गत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान यांनी रिसोड तालुयातील गावांना भेटी दिल्या व गणेशपुर - पाचंबा या गावातील ग्रामस्थांशी संवाद साधला. भेटी दरम्यान उपस्थित सरपंच आणि ग्रामस्थांच्या सहभागाने गावात श्रमदान करून स्वच्छता अभियान राबविण्यात आले तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. दरम्यान सीईओ अर्पित चौहान यांनी स्वतः हातात झाडू घेत लोकांसोबत ग्रामस्वच्छता केली व स्वच्छतेचे महत्व पटवून दिले. यावेळी सेवा संकल्प अभियानांतर्गत १७ सप्टेंबर ते १७ ऑटोबर २०२६ पर्यंत राबविण्यात येणार्‍या उपक्रमांची माहिती देण्यात आली.
 
 
zilla-parishad-ceo
 
ग्रामस्थांना घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६ व कचरा विलगीकरणाचे महत्त्व पटवून देत मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते डस्टबिनचे वितरण करण्यात आले. हरित महाराष्ट्राचा संदेश देत ग्रामपंचायतीच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले आणि महिलांशी व गणेशपुर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांशी स्वच्छतेबाबत संवाद साधण्यात आला. यावेळी जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन खुळे, रिसोड पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पल्लवी लांडे, वाशीम बिडीओ रवींद्र सोनोने यांची उपस्थिती होती.