वाशीम,
two-arrested-for-robbing-truck-driver मालेगाव मार्गावरील सावरगाव बर्डे गावाजवळ ट्रक अडवून चालक व लीनरला चाकूचा धाक दाखवत मारहाण करून लुटल्याच्या वर्षभरापूर्वीच्या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेने छडा लावला आहे. या प्रकरणात अजय चव्हाण आणि आशिष नारायण चव्हाण दोघेही रा. वाशीम यांना २२ सप्टेंबर रोजी ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून १५ हजार रुपये किमतीचा मोबाइल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, मध्य प्रदेशातील उज्जैन जिल्ह्यातील रुपसिंग नारायणसिंग राजपूत हे २९ जुलै २०२४ रोजी रात्री ट्रकमधून माल घेऊन वाशीम-मालेगाव मार्गाने जात होते. सावरगाव बर्डे गावाजवळ तीन ते चार अज्ञात इसमांनी ट्रक अडवून चालक व लीनरला जबर मारहाण केली. त्यानंतर चाकूचा धाक दाखवून लीनरकडील पाच हजार रुपये रोख आणि १५ हजार रुपये किमतीचा मोबाइल असा २० हजार रुपयांचा मुद्देमाल लुटून नेला होता. याप्रकरणी वाशीम ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.