धारदार शस्त्राने कामगाराची हत्या

गोंदियाच्या मुंडीपार (एमआयडीसी) परिसरातील घटना

    दिनांक :23-Sep-2026
Total Views |
गोंदिया,
worker-murdered-with-a-sharp-weapon कामावर जात असलेल्या ५८ वर्षीय इसमावर अज्ञात आरोपींनी धारदार शस्त्राने हल्ला करून त्याची हत्या केल्याची घटना मंगळवारी २२ सप्टेंबर रोजी रात्री साडेसात वाजताच्या सुमारास तालुक्यातील एमआयडीसी मुंडीपार येथे घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रविशंकर उदयलाल रहांगडाले (५८) रा. मुंडीपार असे मृताचे नाव आहे.
 
 
worker-murdered-with-a-sharp-weapon
 
मिळालेल्या माहितीनुसार रविशंकर हे मंगळवारी रात्री साडेसात वाजताच्या सुमारास घरून कामावर जात असताना अज्ञात मारेकर्‍यांनी त्यांच्यावर हल्ला केला. यावेळी आरोपींनी धारदार शस्त्राने त्यांच्या डोक्यावर वार केले. ज्यामध्ये ते गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती गंगाझरी पोलिसांना देण्यात आली. ठाणेदार धीरज राजुरकर यांच्या नेतृत्वात गंगाझरी पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गोंदिया येथील केटीएस सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले. हत्येमागील नेमके कारण अद्यापही स्पष्ट झालेले नसून या प्रकरणी गंगाझरी पोलिसांनी अज्ञात आरोपींच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक धीरज राजूरकर करीत आहेत.