जिल्ह्यातील दुष्काळावर मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा

आमदार प्रताप अडसड यांनी दिली माहिती

    दिनांक :24-Sep-2026
Total Views |
धामणगाव रेल्वे
drought-situation दुष्काळसदृश परिस्थितीचा पाहणीदाैरा करण्यासाठी अमरावती विमानतळावर आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार प्रताप अडसड यांनी भेट घेऊन अमरावती जिल्ह्यात पावसाअभावी निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीची सविस्तर माहिती जाऊन घेतली.
 
cm with adsad
पावसाने दडी मारल्यामुळे अनेक भागांत पिकांची वाढ खुंटली असून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परिणामी शेतकऱ्यांसमोर गंभीर आर्थिक संकट उभे राहिले आहे. या परिस्थितीची वस्तुस्थिती मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्याचे आ. अडसड यांनी सांगितले. जिल्ह्यातील परिस्थितीचा तातडीने आढावा घेऊन पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात यावेत, तसेच संकटग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून योग्य आर्थिक मदत व आवश्यक दिलासा मिळावा, अशी आग्रही मागणी यावेळी त्यांनी केली.
 
अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या संकटातून दिलासा मिळावा आणि त्यांच्या पाठीशी शासन भक्कमपणे उभे राहावे यासाठी शासन स्तरावर तातडीने आवश्यक कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी आ. अडसड यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. शेतकऱ्यांना निश्चितपणे आवश्यक तो दिलासा दिला जाईल आणि राज्यशासन शेतकरी बांधवांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी आ. अडसड यांना दिली.