सोयाबीनची कसर कपाशी भरून काढणार का?

कपाशी पिकावर शेतकर्‍याची यावर्षी मदार

    दिनांक :24-Sep-2026
Total Views |
मानोरा,
farmers-success-in-cotton-crop तालुयात यंदा पावसाने मोठा खंड दिल्याने सोयाबीनचे पीक पूर्णपणे हातातून गेले आहे. दीड महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने शेतातील सोयाबीन जळून गेले आहे. अशा परिस्थितीत ज्या शेतकर्‍यांनी आपल्या शेतशिवारात कपाशी पिकाची लागवड केली होती, त्या शेतकर्‍यांची संपूर्ण मदार आता एकट्या कपाशी पिकावर येऊन ठेपली आहे.सोयाबीनची न भरून निघणारी कसर काही प्रमाणात का होईना कपाशी भरून काढेल, या आशेवर शेतकरी आता कपाशीच्या पिकावर अधिक लक्ष देताना दिसत आहे.
 
 
farmers-success-in-cotton-crop
 
तालुयातील शेतकरी आपल्या जोमदार वाढलेल्या कपाशीच्या शेतात उभे असून हातात बोंड धरून पिकाची पाहणी करत आहे. पाटीपासून बोंडापर्यंत आलेले हे पीक सध्या चांगल्या स्थितीत असले तरी पावसाचा अभाव आणि बोंडअळीचा धोका या दोन्ही चिंता शेतकर्‍याच्या चेहर्‍यावर स्पष्ट दिसत आहेत.सोयाबीनने दगा दिल्याने आता हाच शेतकरी आपल्या कपाशीला मूलासारखे जपत आहे. वेळेवर फवारणी, खत व्यवस्थापन, निंदणी यासाठी तो जीवाचा आटापिटा करत आहे. कारण आता हाच एक आधार उरला आहे.कपाशीच तारणार का?गेल्या दोन वर्षांपासून कपाशीला कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकर्‍यांनी कपाशीचा पेरा कमी करून सोयाबीनवर भर दिला होता. मात्र, यंदा सोयाबीननेही हात वर केल्याने शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात सापडला आहे. जर यंदा पावसाने साथ दिली आणि कपाशी बहरली तरच शेतकर्‍याचे वर्षभराचे अर्थचक्र काही प्रमाणात सावरणार आहे, अन्यथा दुहेरी फटका बसणार आहे.