केंद्राच्या मदतीची वाट न पाहता शेतकर्‍यांना भरीव मदत करणार: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

म्हसला येथे पिक पाहणी

    दिनांक :24-Sep-2026
Total Views |
कारंजा लाड,
cm devendra fadnavis केंद्राकडून मदत मिळण्याची प्रतीक्षा न करता राज्याच्या निधीतून मदत देण्याची प्रक्रिया सुरू ठेवण्याचे तसेच कर्जमाफी करून वंचित राहिलेल्या शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ देऊन पिकविम्याचा प्रश्नही तात्काळ मार्गी लावण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
 
 
 
cm devendra fadnavis
 
 
पावसाने तब्बल दीड महिन्याहून अधिक काळ दडी मारल्याने कारंजा तालुयातील खरीप हंगामावर ओढवलेल्या संकटाची तीव्रता आता थेट सरकार दरबारी पोहचल्याने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरुवार, २४ सप्टेंबर रोजी सकाळी साडे ११ वाजता नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करण्याकरिता थेट कारंजा तालुयातील म्हसला येथील शेतकर्‍यांच्या बांधावर पोहचले. यावेळी त्यांच्यासोबत लोकप्रतिनिधींसह प्रशासकीय अधिकार्‍यांची उपस्थिती होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारंजा अमरावती मार्गावरील कारंजा तालुयातील म्हसला येथे देविदास किसन काळे यांच्या गट नंबर २२ मधील ५ एकर सोयाबीन तूर पिकाची प्रत्यक्ष शेतशिवारात जाऊन पाहणी केली. या दौर्‍यामुळे कारंजा तालुयातील शेतकर्‍यांच्या अपेक्षा उंचावल्या असून, नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना सरसकट मदत, पीकविमा आणि दुष्काळी उपाययोजनांबाबत मुख्यमंत्री काय भूमिका मांडतात, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
मुख्यमंत्री फडणवीस गुरुवारी सकाळी ११ वाजता अमरावती विमानतळावर दाखल झाल्यानंतर मोटारीने कारंजा तालुयातील म्हसला येथे त्यांचे आगमन झाल्यानंतर त्यांनी पीक-पाणी परिस्थितीची पाहणी केली. मुख्यमंत्री थेट शेतकर्‍यांच्या बांधावर आल्याने शेतकर्‍यांनी आपल्या अडचणी त्यांच्यासमोर मांडल्यात. पाहणीवेळी आ. सई डहाके, आ. श्याम खोडे, आ. बाबुसिंग महाराज, आ. रणधीर सावरकर, खा.अनुप धोत्रे, कामगार मंत्री आकाश फुंडकर, खा.संजय देशमुख, माजी आ.विजय जाधव,जिल्हा सरचिटणीस डॉ.राजीव काळे यांच्यासह इतर लोकप्रतिनिधी कृषी आयुक्त, जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, जिप मुकाअ अर्पित चव्हान, जिल्हा पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील, उपविभागीय अधिकारी कैलास देवरे, तहसीलदार रवी महाले, तालुका कृषी अधिकारी अश्विनी भोसले, आत्मा महासंचालक अनिसा महाबळे तसेच महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
 
मुख्यमंत्र्यांच्या दौर्‍यामुळे शेतकर्‍यांच्या आशा पल्लवीत
गेल्या काही आठवड्यांपासून पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. आता मुख्यमंत्र्यांनी स्वतः शेतशिवारात येऊन नुकसान पाहिले असल्याने या दौर्‍याकडे केवळ प्रशासकीय पाहणी म्हणून नव्हे, तर संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांच्या मदतीच्या निर्णयाच्या दृष्टीनेही पाहिले जात आहे.cm devendra fadnavis त्यामुळे शेतकर्‍यांच्या आशा पल्लवीत झाल्या.गर्दीमुळे अनेक शेतकर्‍यांना व्यथा मांडता आल्या नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पिक पाहणीस्थळी आले असता शेतकर्‍यांची फार मोठी गर्दी झाली त्यामुळे अनेक शेतकर्‍यांना आपल्या व्यथा मांडता आल्या नाही. परिणामी अनेक शेतकर्‍यांनी नाराजी व्यक्त केली.