समुद्रपूर
sarpanch post reservations राज्य निवडणूक आयोगाने २३ जुलै २०२६ च्या पत्रान्वये एकूण आरक्षण ५० टक्क्यांपेक्षा जास्त असलेल्या १५ जिल्ह्यांमध्ये सरपंच पदाच्या आरक्षणामध्ये सुधारणा करण्याबाबत कळविले होते. या सुचनेनुसार तालुक्यातील ७१ ग्रामपंचायतमध्ये २०२५ ते २०३० मध्ये होणाऱ्या ग्रापं निवडणुकीकरिता सरपंच पदाच्या आरक्षण सोडत तहसील कार्यालयात तहसिलदार कपिल हाटकर यांच्या मार्गदर्शनात काढण्यात आली.

यावेळी तालुक्यातील ग्रामपंचायत पदाधिकारी, विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते यांची उपस्थिती होती. अधिसूचनेव्दारे अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या आरक्षणामध्ये कोणताही बदल नाही. १३ जून २०२५ च्या अधिसूचनेनुसार निश्चित केलेल्या केवळ नागरिकांचा मागास प्रवर्ग व खुला प्रवर्ग यांच्या आरक्षणामध्ये बदल होत असल्यामुळे या शुद्धीपत्रकान्वये नागरिकांचा मागास प्रवर्ग व खुला प्रवर्ग यांचे सुधारित आरक्षण निश्चित करण्यात येत आहे. यानुसार पिपरी, वायगाव (गोंड), तास, फरीदपूर याठिकाणी अनुसूचित जाती तर परडा, सुजातपूर, कुर्ला, बोथुडा, चाकुर अनुसुचित जाती (महिला) करिता राखीव, शेडगाव, कानकाटी, मनगाव, वडगाव, नारायणपूर, दसोडा अनुसूचित जमाती, तर पिंपळगाव, वायगाव (ह.), डोंगरगाव, उमरा, मंगरुळ, कोरा याठिकाणी अनुसूचित जमाती (महिला) करिता राखीव जागा निघाल्या आहेत.
आरंभा कारडा, उमरी, गोविंदपूर, याठिकाणी नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) थेट पद्धतीने काढण्यात आले आहे. तर वाघेडा, साखरा, दहेगाव नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) आरक्षण ईश्वर चिठ्ठीने तर बरबडी, कळमणा, लसनपूर, सेवा, खंडाळा, जाम, हळदगाव याठिकाणी नागरिकांचा मागास प्रवर्ग आरक्षण निघाले आहे. उंदीरगाव, अंतरगाव, निंभा, विखणी, धामनगाव, निरगुडी, खापरी, वाशी, बावापूर, किन्हाळा, कवठा, गिरड, मोहगाव, देरडा, सावंगी (झाडे), झुनका, उसेगाव, बर्फा येथे सर्वसाधारण (महिला)चे आरक्षण निघाले आहेत. तर रामनगर, मांडगाव, सिल्ली, भोसा, धोंडगाव, आजदा, नाद्रा, पारडी, पाठर, नंदोरी, कांढळी, नंदपूर, हिवरा, उब्दा, चिखली, लाहोरी, करुळ, आसोला याठिकाणी सरपंच पदासाठी सर्वसाधारण करिता आरक्षण घोषित करण्यात आले आहे.
ही आरक्षाची संपूर्ण प्रक्रिया तहसीलदार कपिल हाटकर यांच्या मार्गदर्शनात नायब तहसीलदार प्रमोद जांभुळे, मोहन थोरात यांनी संपूर्ण कारवाई केली. यावेळी कुठे मनासारखे तर कुठे ईच्छूकांची हिरमोड झाल्याचे पाहावयास मिळत आहे.