नागपूर,
Mauli Seva Mitra Mandal माऊली सेवा मित्र मंडळ नागपूर आणि गडचिरोली पोलीस दलाच्या सहकार्याने अतिदुर्गम नक्षलग्रस्त भामरागड तालुक्यातील लाहेरी येथे गरजू विद्यार्थ्यांना २१ सायकलींचे मोफत वाटप करण्यात आले.
या भागातील अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी दररोज चार ते पाच किलोमीटर पायी प्रवास करतात. विद्यार्थ्यांचा हा त्रास कमी व्हावा आणि त्यांना शिक्षणासाठी ये-जा करणे सोपे व्हावे, या उद्देशाने माऊली सेवा मित्र मंडळाकडून गेल्या काही वर्षांपासून दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप केले जात आहे.यापूर्वीही मंडळाच्या वतीने १५० सायकलींचे वाटप करण्यात आले होते. या उपक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व दानदात्यांचे माऊली सेवा मित्र मंडळाच्या वतीने आभार मानण्यात आले.
सौजन्य:सुहास खरे,संपर्क मित्र