लालबागच्या राजाला ९९व्या वर्षीचा हा अनोखा निरोप

    दिनांक :24-Sep-2026
Total Views |
मुंबई
mumbaicha raja visarjan 2026 सार्वजनिक गणेशोत्सवातील मानाचे स्थान असलेल्या गणेश गल्लीच्या ‘मुंबईचा राजा’च्या विसर्जन सोहळ्याबाबत यंदा विशेष उत्सुकता निर्माण झाली आहे. गणेश गल्लीतील लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळाने यंदाच्या ९९व्या वर्षी बाप्पाला अनोख्या पद्धतीने निरोप देण्याचा निर्णय घेतला आहे. २५ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ७ वाजता शेवटची महाआरती झाल्यानंतर विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार असून, गिरगाव चौपाटीवर अत्याधुनिक बार्जच्या माध्यमातून २२ फूट उंचीच्या गणेशमूर्तीचे थेट खोल समुद्रात विसर्जन करण्यात येणार आहे.
 

mumbaicha raja visarjan 2026 : 22-foot ganpati to be immersed in deep sea from barge at girgaon chowpatty 
लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ, गणेश गल्लीच्या वतीने आयोजित विसर्जन मिरवणूक आपल्या पारंपरिक मार्गाने लालबागहून गिरगाव चौपाटीकडे मार्गस्थ होईल. दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशभक्त मोठ्या संख्येने मिरवणुकीत सहभागी होण्याची शक्यता आहे. मात्र, यंदाच्या विसर्जन पद्धतीमुळे या सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
गिरगाव चौपाटी येथे पोहोचल्यानंतर ‘मुंबईच्या राजा’च्या २२ फूट उंचीच्या भव्य मूर्तीचे बार्ज जहाजावरून विसर्जन केले जाणार आहे. यासाठी क्रेन आणि बार्जच्या साहाय्याने मूर्ती खोल समुद्रात नेऊन विसर्जित करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विसर्जन करण्याचा हा यंदाच्या विसर्जन सोहळ्याकडे गणेशभक्तांचे लक्ष लागले असून, ९९व्या वर्ष निर्णय मंडळाच्या ९९व्या वर्षातील महत्त्वाचा उपक्रम ठरणार आहे.
 
 
मुंबई तसेच महाराष्ट्रातील गणेशोत्सवाच्या इतिहासात अशा पद्धतीने विसर्जन करण्याचा हा पहिलाच प्रयोग असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे ‘मुंबईचा राजा’च्या यंदाच्या विसर्जन सोहळ्याकडे गणेशभक्तांचे लक्ष लागले असून, ९९व्या वर्षीचा हा अनोखा निरोप सोहळा चर्चेचा विषय ठरला आहे.