पार्किंगची सोय तरीही वाहनांवर कारवाई का?

    दिनांक :24-Sep-2026
Total Views |
नागपूर
parking-facility जयप्रकाश नगर मेट्रो स्टेशनवर वाहनांसाठी पार्किंगची सुविधा उपलब्ध असतानाही दररोज वाहने उचलून नेली जात असल्याने वाहनधारकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.पार्किंगची जागा उपलब्ध असताना वाहनांवर कारवाई नेमकी कशासाठी? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
 
parking-facility
 
सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. पार्किंगसाठी वाहन उभे केल्यानंतरही वाहने उचलून स्टेशनमध्ये जमा केली जात असल्याने नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. संबंधित कर्मचाऱ्यांकडे विनंती करूनही कारवाई सुरूच असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.मेट्रो प्रशासनाने पार्किंगची सुविधा उपलब्ध करून दिली असताना वाहनधारकांना नेमक्या कोणत्या नियमाचा भंग केल्यामुळे कारवाईला सामोरे जावे लागत आहे, याबाबत स्पष्टता होणे गरजेचे आहे. नियम असतील तर ते स्पष्टपणे दर्शवावेत आणि पार्किंगची सुविधा असेल तर नागरिकांना त्याचा वापर करण्यापासून रोखू नये अशी मागणी होत आहे.या प्रकरणाची वाहतूक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घेऊन प्रत्यक्ष पाहणी करावी आणि नागरिकांना होणारा त्रास दूर करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
 
 
सौजन्य: उज्ज्वल जोशी, संपर्क मित्र