महिलांवरील लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात २३ टक्क्यांनी वाढ

प्रेमप्रकरण आणि अनैतिक संबंधातून सर्वाधिक गुन्हे : ८ महिन्यांत १७० गुन्ह्यांची नोंद

    दिनांक :24-Sep-2026
Total Views |
अनिल कांबळे
 
 
नागपूर,
sexual assault cases शहरातील तरुणी आणि महिलांच्या सुरक्षेसाठी नेहमी तत्पर असणाऱ्या नागपूर शहरात गेल्या आठ महिन्यांत १७० महिला-तरुणींवर लैंगिक अत्याचार झाल्याच्या घटनांची नोंद करण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी लैंगिक अत्याचाराचे जवळपास २३ टक्क्यांनी गुन्हे जास्त दाखल झाले आहेत. या लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांमध्ये सर्वाधिक गुन्हे प्रेमप्रकरण आणि अनैतिक संबंधातून दाखल झाल्याचे जळजळीत सत्य समोर आले आहे.
 

nagpur sees 23% rise in sexual assault cases against women, 170 cases registered in 8 months 
 
 
ज्येष्ठ नागरिक आणि महिला सुरक्षेला नागपूर शहर पोलिसांकडून प्राधान्य देण्यात येते. पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी महिलांच्या सुरक्षेसाठी विविध उपक्रम आणि विविध पथके कार्यान्वित केले आहेत. नुकताच निर्भया पथकाचे जवळपास १२ वाहने शहरात प्रायोगिक तत्वावर गस्त घालत असून महिलांसंदर्भात नागपूर पोलिस गांभीर्याने काम करीत असल्याचे चित्र आहे. तरीही गेल्या वर्षीच्या तुलनेत शहरात महिलावरींल लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये बरीच वाढ झाली आहे. गेल्या वर्षी २०२५ ऑगस्टपर्यंत १३८ गुन्हे दाखल होते. तसेच १३७ गुन्ह्यातील आरोपींना अटक करुन गुन्हे निकाली काढले होते. तसेच यावर्षी ऑगस्ट २०२६ पर्यंत लैंगिक अत्याचाराचे १७० गुन्हे दाखल आहेत. गतवर्षीपेक्षा यावर्षी ३२ लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात वाढ झाली आहे. यावर्षी दाखल गुन्ह्यांपैकी सर्वच गुन्ह्यांचा छडा लावून १०० टक्के निर्गती करण्यात आली आहे, हे विशेष.
प्रेमसंबंधातून सर्वाधिक गुन्हे
प्रियकर आणि प्रेयसींमध्ये प्रेमसंबंध असतात. मात्र, दोघांपैकी एकाकडून दगा मिळाल्यानंतर थेट बलात्कार केल्याचा आरोप करण्यात येतो. अनेकदा प्रियकराकडून लग्नाचे आमिष दाखविल्यानंतर शारीरिक संबंध ठेवल्या जातात. मात्र, काही वर्षांनंतर प्रियकर लग्नास नकार देतो, अशा स्थितीत तरुणी प्रियकराविरुद्ध बलात्काराच्या तक्रारी देतात. अशा प्रकारातून दाखल झालेल्या गुन्ह्यांची संख्या जास्त आहे.
 
 

विवाहबाह्य संबंधात कटूता
विवाहित पुरुष किंवा विवाहित महिलांमध्ये सध्या अनैतिक संबंध वाढत आहेत. गेल्या काही वर्षांपासून विवाहबाह्य संबंधाला उधाण आले आहे. अनेकदा विवाहित महिला किंवा पुरुषांचे अनैतिक संबंधात कटुता निर्माण होते. तसेच अनैतिक संबंधाची कुणकुण पती किंवा पत्नीपर्यंत पोहचते. कौटुंबिक अचडण निर्माण झाल्यावर महिलांककडून लैंगिक शोषण केल्याची तक्रार पोलिस ठाण्यात देण्यात येते, अशा तक्रारींचाही वरील वाढीव गुन्ह्यात समावेश आहे.
 
 
मुली-तरुणी आणि महिलांच्या सुरक्षेला पोलिसांकडून प्राधान्य दिल्या जाते. महिलांनी केलेल्या तक्रारींना गांभीर्याने घेतल्या जाते. लैंगिक अत्याचारासारख्या तक्रारी महिला पोलिस अधिकाऱ्यांमार्फत तातडीने दाखल करुन कारवाई करण्यात येते. महिलांच्या सुरक्षेसाठी नागपूर पोलिस तत्पर आहेत.
 
 
nagpur sees 23% rise in sexual assault cases against women, 170 cases registered in 8 months
 
 
                                                               नवीनचंद्र रेड्डी (पोलिस सहआयुक्त)