NEET-PG 2026 चा निकाल जाहीर

कट-ऑफही स्पष्ट, २६५ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचे भवितव्य ठरणार

    दिनांक :24-Sep-2026
Total Views |
मुंबई/नवी दिल्ली 
neet pg देशभरातील वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी महत्त्वाची असलेली NEET-PG 2026 परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (NBEMS) ने अधिकृत संकेतस्थळावर निकाल प्रसिद्ध केला असून परीक्षेला बसलेल्या उमेदवारांना आपला निकाल आणि पात्रता कट-ऑफ तपासता येणार आहे.
 

neet pg  
यंदाच्या परीक्षेसाठी श्रेणीनुसार पात्रता पर्सेंटाइल आणि त्यासाठी आवश्यक गुणही जाहीर करण्यात आले आहेत. General आणि EWS प्रवर्गातील उमेदवारांना पात्र होण्यासाठी ५० व्या पर्सेंटाइलसह किमान २६२ गुण मिळवणे आवश्यक आहे. General PwBD प्रवर्गासाठी ४५ व्या पर्सेंटाइलसह २४४ गुणांचा निकष ठेवण्यात आला आहे. तर SC, ST आणि OBC प्रवर्गातील उमेदवारांसाठी ४० व्या पर्सेंटाइलसह किमान २२६ गुण आवश्यक आहेत.NEET-PG 2026 परीक्षेला देशभरातून एकूण २,६५,९६० विद्यार्थी उपस्थित होते. मुख्य परीक्षा ३० ऑगस्ट रोजी घेण्यात आली. मात्र, जयपूरमधील एका परीक्षा केंद्रावर वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे काही विद्यार्थ्यांच्या परीक्षेवर परिणाम झाला होता. या विद्यार्थ्यांसाठी ५ सप्टेंबर रोजी फेरपरीक्षा घेण्यात आली.दरम्यान, परीक्षेतील प्रश्नपत्रिकेचे तज्ज्ञांकडून पुनरावलोकन करण्यात आले. या तपासणीत प्रश्नपत्रिकेतील कोणत्याही प्रश्नात त्रुटी आढळली नसल्याचे NBEMS कडून स्पष्ट करण्यात आले आहे.उमेदवारांना त्यांचे वैयक्तिक स्कोरकार्ड आणि उत्तरतालिका १ ऑक्टोबर २०२६ पासून ऑनलाइन डाउनलोड करता येणार आहेत. ही गुणपत्रिका अधिकृत संकेतस्थळावर केवळ सहा महिन्यांसाठी उपलब्ध राहणार असल्याने विद्यार्थ्यांनी ती मुदतीपूर्वी डाउनलोड करून सुरक्षित ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.दरम्यान, NEET-SS 2025 संदर्भातही महत्त्वाचा बदल करण्यात आला असून पात्रतेसाठी आवश्यक पर्सेंटाइल ५० वरून ३० करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षणाच्या पुढील प्रवेश प्रक्रियेकडे आता विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.