देशभरात २ ऑक्टोबरला ‘नो यूपीआय डे’

    दिनांक :24-Sep-2026
Total Views |

 


नवी दिल्ली
no upi day डिजिटल इंडियाच्या युगात ‘गुगल पे’, ‘फोन पे’ आणि ‘पेटीएम’ सारख्या ‘यूपीआय’ ॲप्सचा वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची आणि मोठी घोषणा करण्यता आली आहे. केंद्र सरकारने यूपीआय व्यवहारांवर लागू केलेल्या नव्या शुल्काविरोधात देशभरातील व्यापाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
 
no upi
१५ ऑक्टोबरपासून लागू होणाऱ्या नव्या ‘मर्चंट डिस्काउंट रेट’च्या निषेधार्थ व्यापारी संघटनांनी थेट राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी, म्हणजेच २ ऑक्टोबर रोजी ‘नो यूपीआय डे’ पाळण्याचे मोठे आवाहन केले आहे. ‘फेडरेशन ऑफ ऑल इंडिया व्यापार मंडळ’ आणि ‘कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स’ यांसारख्या देशातील आघाडीच्या व्यापारी संघटनांनी हा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, २ ऑक्टोबर रोजी देशभरातील छोटे-मोठे व्यावसायिक, किरकोळ दुकानदार आणि पेट्रोल पंप चालक यूपीआयद्वारे डिजिटल पेमेंट स्वीकारणार नाहीत. त्यामुळे त्या दिवशी ग्राहकांना खरेदीसाठी रोख रक्कम किंवा क्रेडिट, डेबिट कार्डचा वापर करावा लागणार आहे. ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स’चे अध्यक्ष रवींद्र मंगवे यांनीही या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा दिला आहे.
 

‘ऑल इंडिया मोबाईल रिटेलर्स असोसिएशन’, ‘ऑल इंडिया ज्वेलर्स अँड गोल्डस्मिथ फेडरेशन’ आणि ‘रिटेल ट्रेडर्स वेल्फेयर असोसिएशन’ यांसारख्या प्रमुख संघटना २ ऑक्टोबरच्या आंदोलनात सक्रिय सहभागी होणार आहेत.