नागपूर,
Pratapnagar Vidyalaya प्रतापनगर शिक्षण संस्थेद्वारा संचालित प्रतापनगर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात गरजू व होतकरू विद्यार्थी मुलींना सायकलीचे मोफत वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरवातीला उपस्थित माजी आमदार अनिल सोले, संस्थेचे अध्यक्ष प्रा.गिरीश देशमुख, उपाध्यक्ष शंकर पहाडे, सचिव अनुपमा नाफडे, पदाधिकारी प्रशांत वैद्य, मुख्याध्यापिका सुनंदा गौरकर, सामाजिक कार्यकर्ते विवेक गर्गे, सुजित भडभडे इत्यादीच्या हस्ते श्री. गणेशाचे पूजन करण्यात आले.
माजी आमदार प्रा. अनिल सोले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून स्व. शुभदा गर्गे यांच्या स्मृती प्रित्यर्थ व रचना आंगन फ्लॅट ओनर्स असोसिएशनच्या च्या वतीने विद्यालयातील गरजू व होतकरू विद्यार्थिनींना उपस्थित अतिथींच्या हस्ते सायकलीचे मोफत वितरण करण्यात आले. सायकल प्राप्त होताच विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला.यावेळी प्रमुख अतिथी माजी आमदार अनिल सोले यांनी सायकल मिळाल्याने या गरजू विद्यार्थिनींचा येण्या जाण्याचा त्रास कमी होऊन अभ्यासाला अधिक वेळ मिळणार असल्याचे सांगून शालेय व्यवस्थापन विद्यार्थ्यांच्या हितासाठी घेत असलेल्या परिश्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. गिरीश देशमुख यांनी शाळा मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन वर्षभर विद्यार्थी हितार्थ अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवत असल्याचे सांगून शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीवर मेहनत घेत असल्याचे आवर्जून सांगितले.कार्यक्रमाला विद्यार्थी, पालकांसह शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सौजन्य :विजय दाणी,संपर्क मित्र