
‘जे काही घडले ते माझ्यामुळे घडले नाही. तो भारतीय वुशू महासंघाचा निर्णय होता. त्यांनी जो काही निर्णय घेतला, तो योग्यच होता असे मला वाटते,’ असे रोशिबिना देवी नोरमने ठामपणे सांगितले. मी त्या आरोपांकडे दुर्लक्ष करेन. मला फक्त माझ्या ध्येयावर लक्ष केंद्रित करायचे आहे, असे मणिपूरच्या या खेळाडूने सांगितले. जूनमध्ये श्रीनगर येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या निवड चाचणीत रोशिबिनाचा पराभव करणाऱ्या दिव्यांशीला 'एसीएल' दुखापतीमुळे संघातून वगळण्यात आले होते. तिने फेडरेशनवर पक्षपाताचा आरोप केला आणि रोशिबिना आशियाई क्रीडा स्पर्धेच्या संघात स्थान मिळवण्यासाठी आपल्या विरोधात काम करत असल्याचा दावा केला. रोशिबिनाला जपानला जायचे होते म्हणून आपल्याला त्रास दिला जात असल्याचा आरोप दिव्यांशीने केला होता. या आरोपाला उत्तर देताना, वुशू असोसिएशन ऑफ इंडियाने तिचा एमआरआय अहवाल सादर केला, ज्यामध्ये 'एसीएल'ला अंशतः गंभीर दुखापत असल्याचे दिसून आले; यावरून दिव्यांशीच्या जागी रोशिबिनाची निवड करणे योग्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.