sarsanghchalak dr mohanji bhagwat येथील दीनदयाल सेवा प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी पंडित दीनदयाल उपाध्याय जयंती समारोह आयोजित करण्यात येतो. यावर्षी हा कार्यक्रम मंगळवार, २९ सप्टेंबर रोजी दुपारी २.३० वाजता दारव्हा मार्गावरील चिंतामणी कृषी उत्पन्न बाजार परिसरात आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्ताने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत विशेषत्वाने उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.

दीनदयाल संस्थेची त्रिदशकपूर्ती, दीनदयाल प्रबोधिनीची दशकपूर्ती आणि संघशताब्दीच्या औचित्यावर सरसंघचालकांची ही संस्था भेट होत असून ते दीनदयालजींच्या कामाची व्याप्ती आणि विस्ताराचे अवलोकन करतील. २९ सप्टेंबरला दुपारी २.३० वाजता चिंतामणी कृषी उत्पन्न बाजार परिसरात आयोजित जाहीर कार्यक्रमास दीनदयाल संस्थेच्या विविध प्रकल्पांचे सहयोगी, संस्थेचे हितचिंतक, देणगीदार, गणमान्य नागरिक तथा बंधू-भगिनींनी वेळेच्या ३० मिनिटांपूर्वी उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष नरहर देव तथा संचालक मंडळाने केले आहे.