स्काऊट मास्टर सुनील अटेल यांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार

    दिनांक :24-Sep-2026
Total Views |
नागपूर,
ideal-teacher-award शिक्षण विभाग प्राथमिक व माध्यमिक, जिल्हा परिषद, नागपूर यांच्या वतीने शिक्षक दिनाचे औचित्य साधून दरवर्षी ५ सप्टेंबर रोजी शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षापासून प्रथमच स्काऊट-गाईड विभागासाठी जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार सुरू करण्यात आला आहे. या पुरस्काराचे वितरण जिल्हा नियोजन भवन, सदर, नागपूर येथे करण्यात आले. नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) विनायक महामुनी यांच्या हस्ते स्काऊट मास्टर सुनील अटेल यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
 
ideal-teacher-award
 
यावेळी स्काऊट-गाईड चळवळीच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची आणि कार्याची माहिती उपस्थितांना देण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, स्वावलंबन, नेतृत्वगुण, साहस, देशप्रेम, सेवाभाव आणि सामाजिक बांधिलकी निर्माण करण्यासाठी सुनील अटेल सातत्याने कार्यरत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना स्काऊट-गाईड चळवळीच्या माध्यमातून विविध कौशल्यांचे प्रशिक्षण मिळत आहे. सुनील अटेल यांच्या मार्गदर्शनाखाली आजनगाव येथील गाईड जीविका धुर्वे हिची राष्ट्रपतींच्या सलामी पथकासाठी निवड झालेल्या ६ गाईडमध्ये निवड झाली आहे. स्काऊट-गाईड क्षेत्रातील त्यांच्या सातत्यपूर्ण योगदानाची दखल घेत त्यांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले.
सौजन्य: डॉ. संध्या पवार, संपर्क मित्र