रुग्णालयातील नवजात शिशू विभागाला भीषण आग तीन बालकांचा मृत्यू,

२८ जणांची सुखरूप सुटका

    दिनांक :24-Sep-2026
Total Views |
आदिलाबाद
telangana hospital fire तेलंगणातील आदिलाबाद येथील राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (RIMS) रुग्णालयाच्या नवजात शिशू विशेष काळजी विभागात (SNCU) सोमवारी रात्री साडेअकराच्या सुमारास भीषण आग लागल्याची हृदयद्रावक घटना घडली. या दुर्घटनेत तीन नवजात बालकांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये अवघ्या पाच दिवसांच्या एका चिमुकल्याचाही समावेश असून, आगीच्या ज्वाळांमध्ये होरपळून त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे. अन्य एका बालकाचा उपचारादरम्यान, तर तिसऱ्या बालकाचा मंगळवारी सकाळी धुरामुळे श्वास गुदमरल्याने मृत्यू झाला. प्रशासनाच्या माहितीनुसार, मृत बालके इच्चोडा, इंद्रावेली आणि उत्नूर परिसरातील रहिवासी होती.

telangana hospital fire  
प्राथमिक माहितीनुसार, SNCUमधील एसी युनिटमध्ये अचानक स्फोट झाल्याने आग लागली असावी, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आग लागल्यानंतर काही वेळातच संपूर्ण विभागात दाट धूर पसरला. इन्क्युबेटरमध्ये उपचार घेत असलेल्या नवजात बालकांचा जीव धोक्यात आल्याने पालक, परिचारिका आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. खिडक्यांच्या काचा फोडून २८ बालकांना विभागाबाहेर काढण्यात आले. दरम्यान, अग्निशमन दलाच्या जवानांनी सुमारे तासभर प्रयत्न केल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवले.
बालकांना सुरक्षित बाहेर काढताना काही परिचारिका आणि रुग्णालयातील कर्मचारी जखमी झाले. आग आणि धुराच्या परिस्थितीत बचावकार्य करताना त्यांना भाजल्याची माहिती आहे. बाहेर काढलेल्या बालकांपैकी काहींना धुरामुळे श्वसनाचा त्रास जाणवू लागला. तेलंगणाचे आरोग्यमंत्री दामोदर राजा नरसिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन गंभीर बालकांना आदिलाबादमधील खासगी रुग त्यांनी घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. जखमी बालकांना मोफत आणि दर्जेदार वैद्यकीय उपचार मिळतील, याची काळजी घेण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी राज्यातील सर्व सरकारी रुग्णालयांचे्णालयात दाखल करण्यात आले, तर अन्य दोन बालकांना पुढील उपचारांसाठी तातडीने निजामाबाद येथे हलवण्यात आले.
या दुर्घटनेची मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांनी गंभीर दखल घेतली असून, त्यांनी घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. जखमी बालकांना मोफत आणि दर्जेदार वैद्यकीय उपचार मिळतील, याची काळजी घेण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी राज्यातील सर्व सरकारी रुग्णालयांचे सुरक्षा आणि अग्निसुरक्षा लेखापरीक्षण तातडीने करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
दरम्यान, आगीचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलीस आणि अग्निशमन विभागाकडून तपास सुरू आहे. शॉर्टसर्किटमुळे आग लागली की एसी यंत्रणेतील तांत्रिक बिघाडामुळे स्फोट झाला, याचा तपास केला जात आहे. या प्रकरणाचा सविस्तर अहवाल लवकर सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. रुग्णालयातील निष्काळजीपणा तपासात आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.