नागपुरात ‘द स्टड्स’ स्पोर्ट्स ग्रिलची एन्ट्री

    दिनांक :24-Sep-2026
Total Views |
नागपूर,
the-studs-sports-grill-nagpurभारतातील स्पोर्ट्स आणि एंटरटेनमेंट क्षेत्रातील प्रसिद्ध ब्रँड ‘द स्टड्स’ स्पोर्ट्स बार अँड ग्रिलने नागपुरात प्रवेश केला असून, सिव्हिल लाइन्स परिसरात नव्या लार्ज-फॉरमॅट आउटलेटचे उद्घाटन करण्यात आले आहे. नागपूर फ्रँचायझीचे मालक शुभंकर देशपांडे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत या आउटलेटच्या अधिकृत लॉन्चची घोषणा केली. क्रीडा, खाद्यपदार्थ, संगीत आणि सोशलायझिंगचा अनुभव एकाच छताखाली देण्याच्या उद्देशाने हे आउटलेट सुरू करण्यात आले आहे. २० फूट उंच इंटिरियर, मेझानाइन सीटिंग, मोठी स्क्रीन, लाइव्ह परफॉर्मन्ससाठी स्टेज, F1 सिम्युलेटर, पूल टेबल आणि प्लेस्टेशन गेमिंग अशा सुविधा येथे उपलब्ध आहेत.
 

studs 
क्रिकेट, फुटबॉल, फॉर्म्युला 1 यांसह विविध प्रमुख क्रीडा स्पर्धांचे थेट प्रक्षेपण येथे करण्यात येणार असून, लाइव्ह बँड, अॅक्युस्टिक परफॉर्मन्स, डीजे, कराओके आणि विविध गेम्सचेही आयोजन केले जाणार आहे. खाद्यपदार्थांमध्ये भारतीय तसेच जागतिक खाद्यसंस्कृतीचा प्रभाव असलेल्या पदार्थांसोबत साओजी फ्राइजसारख्या नागपूरच्या खाद्यसंस्कृतीची झलक देणाऱ्या पदार्थांचाही समावेश आहे. सिग्नेचर चिकन बिर्याणी, कूर्ग पेपर चिकन स्लायडर्स, कलमी पनीर टिक्का, सिलोन लॅम्ब करी, टेंडर कोकोनट पन्ना कोट्टा यांसह विविध कॉकटेल्स, बिअर आणि इतर पेये उपलब्ध असतील.
 
मितेन शाह आणि अभिलाष मेनन यांनी २०१७ मध्ये मुंबईत ‘द स्टड्स’ची स्थापना केली. पारंपरिक स्पोर्ट्स बारच्या पलीकडे जाऊन स्पोर्ट्स, खाद्यपदार्थ, संगीत, लाइव्ह एंटरटेनमेंट आणि गेमिंगचा एकत्रित अनुभव देणारी ठिकाणे निर्माण करण्याची ब्रँडची संकल्पना आहे. मुंबई, बंगळुरू, रांची, नैनीताल आणि चंदीगडनंतर आता नागपुरात विस्तार करण्यात आला असून, लवकरच दुबईतही ब्रँडचा प्रवेश होणार आहे. ‘द स्टड्स’ हा Ambros World Foods (AWF) या भारतीय फूड आणि हॉस्पिटॅलिटी कंपनीचा भाग आहे.