न्यू यॉर्क,
united-nations-credibility-at-risk जगभरात वाढणारी युद्धे आणि संघर्षाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असताना जागतिक नेते मात्र आपआपल्या सोयीनुसार मौन पाळत आहे. परिस्थिती अशीच राहिल्यास जग युद्धाच्या सापळ्यात अडकले जाईल अशी भीती व्यक्त करत ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुला दा सिल्वा यांनी अमेरिकेच्या हस्तक्षेपावर संताप व्यक्त केला.
संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या व्यासपीठावर बोलताना लुला म्हणाले, ब्राझील एक सार्वभौम देश आहे, कोणीही आम्हाला त्या मार्गापासून विचलित करू शकत नाही. परकीय शक्तींचा वारंवार होणारा हस्तक्षेप सहन केला जाणार नाही. संपूर्ण जग युद्धाने उद्ध्वस्त होत आहे. संघर्ष आणि गोंधळ सर्वत्र पसरत असताना जागतिक नेते काय करत आहे? तर ते विध्वंस पाहत आहे, मात्र कोणीही याविरोधात बोलायला तयार नाही.
आपआपल्या सोयीनुसार भूमिका घेतात. २०२५ मध्येच, दुसऱ्या महायुद्धानंतरचे सर्वाधिक सशस्त्र संघर्ष जगाने पाहिले. नवीन शस्त्रे मिळवण्यासाठी डॉलर पाण्यासारखे खर्च केले गेले. संयुक्त राष्ट्र मानवतेला युद्धाच्या धोक्यापासून वाचवण्यात सातत्याने अपयशी ठरत आहे. त्याची विश्वासार्हता यापूर्वी कधीही इतकी खालावली नव्हती. शक्तिशाली लोकांसाठी कायदेशीर सवलतींनी मर्यादा ओलांडली आहे. हा आदर्शवाद नाही, तर शुद्ध वास्तववाद आहे. युद्ध हे राजकारणाचा विस्तार नाही, तर तो संपूर्ण अंत आहे. आमच्यावर शुल्क आकारण्यात आले, एकतर्फी शुल्क हा इतर देशातील हस्तक्षेप असूुन, ब्राझील कधीही सहन करणार नाही.