युद्धाला कंटाळले अमेरिकी सैनिक,आत्महत्येचा करताहेत प्रयत्न

इराणविरोधात 300 हून अधिक दिवस तैनात होते

    दिनांक :24-Sep-2026
Total Views |
न्यूयॉर्क
us-iran war अमेरिकन युद्धनौका uss अब्राहम लिंकनच्या स्ट्राइक ग्रुपमध्ये सहभागी असलेल्या 8 नौसैनिकांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. यापैकी एक नौसैनिक जहाजावरून समुद्रात उडी मारून गेला, तर दुसऱ्याला उडी मारण्यापूर्वी सहकाऱ्यांनी रोखले. या घटना त्या वेळी घडल्या, जेव्हा uss लिंकन 300 दिवसांहून अधिक काळ समुद्रात तैनात होते आणि इराणविरोधातील अमेरिकन मोहिमेत सहभागी होते.

war 1
अमेरिकन नौदलाचे कार्यवाहक सचिव हंग काओ यांनी सिनेटर कर्स्टन गिलिब्रँड यांना पाठवलेल्या पत्रात ही माहिती दिली.
पत्रानुसार, ऑगस्टच्या सुरुवातीला एका नौदलाच्या जहाजावरून एका नौसैनिकाने समुद्रात उडी घेतली होती. नौदलाच्या बचाव हेलिकॉप्टरने त्याला वाचवले.
दरम्यान, मार्चमध्ये आणखी एका नौसैनिकाने समुद्रात उडी घेण्याचा प्रयत्न केला होता; मात्र त्याच्या सहकाऱ्यांनी त्याला रोखले.
 
लिंकनवर सुमारे 5,000 नौसैनिक तैनात
uss  अब्राहम लिंकनवर सुमारे 5,000 नौसैनिक तैनात आहेत. हे जहाज 300 हून अधिक दिवस समुद्रात होते. अलीकडेच कोणत्याही बंदरात न थांबता सर्वाधिक काळ समुद्रात राहण्याचा अमेरिकी नौदलाचा विक्रम या जहाजाने केला.
या महिन्याच्या सुरुवातीला uss अब्राहम लिंकन 5 दिवसांसाठी थायलंडमधील पट्टाया येथे थांबले होते. त्यानंतर शनिवारी ते गुआम येथे पोहोचले. डेमोक्रॅट सिनेटर कर्स्टन गिलिब्रँड यांनी जहाजावर तैनात सैनिकांची स्थिती आणि मानसिक आरोग्याबाबत नौदलाकडून माहिती मागवली होती. त्याला उत्तर म्हणून नौदलाने त्यांना हे पत्र पाठवले.
गिलिब्रँड यांनी सांगितले की, या घटनांवरून णडड लिंकनवर तैनात सैनिकांची परिस्थिती गंभीर असल्याचे दिसून येते. जसजसा काळ वाढत गेला, तसतशी परिस्थिती आणखी बिघडत गेली.
दीर्घकाळ समुद्रात राहणे सोपे नाही
अमेरिकी नौदलाचे अ‍ॅडमिरल ब्रॅड कूपर यांनी ऑगस्टमध्ये सांगितले होते की, णडड लिंकनवरील मानसिक तणाव किंवा मानसिक आरोग्याशी संबंधित प्रकरणांची संख्या नौदलाच्या इतर विमानवाहू युद्धनौकांच्या तुलनेत कमी होती. तथापि, त्यांनी हेही मान्य केले की याचा अर्थ जहाजावरील सर्व काही ठीक होते, असा नाही. त्यांच्या मते, अनेक महिने समुद्रात राहणे सोपे नसते. त्यामुळे तणाव वाढतो आणि प्रत्येक व्यक्ती त्याचा वेगवेगळ्या पद्धतीने सामना करते.