वन्य प्राण्यांच्या धुडगुसाने हातचे पीक जाणार

६०० हेटरमध्ये नीलगाईचे चार कळप

    दिनांक :26-Sep-2026
Total Views |
मोझरी (शेकापूर),
four-herds-of-nilgai-in-600-hectares यंदा प्रथमच पाच वर्षांनंतर सोयाबीन व कपाशीचे निरोगी पीक बघायला मिळाले. परंतु, या परिसरातील ६०० हेटरमधील पिकं नीलगाईंनी उद्ध्वस्त करायला सुरुवात केली आहे. यंदा दुष्काळग्रस्त परिस्थिती असताना सुद्धा मोझरी परिसरातील पिकं तग धरून आहेत. पावसाच्या खंडामुळे उत्पन्नात ३० टयांची घट येण्याची शयता असतानाच आता वन्यप्राण्यांनी पिकांमध्ये चांगलाच धुडगूस घातला आहे. या परिसरातील पिकांमध्ये नीलगाईंच्या चार कळपांनी शिरकाव केला असून संपूर्ण पीक उद्ध्वस्त होण्याची स्थिती निर्माण झाली आहे.
 
 
four-herds-of-nilgai-in-600-hectares
 
खरीप हंगामातील पिकात शिरणारी वन्य श्वापदे झटका मशीनला देखील जुमानत नसल्याचे शेतकरी सांगतात, हे उल्लेखनीय! दिवसा नीलगाईंचे कळप परिसरातील झाडी झुडपात आश्रयाला असतात. सायंकाळी ५ वाजताच २० ते २२ नीलगाईंचा तांडा उभ्या पिकांचा फडशा पाडण्यासाठी शेतात शिरताना दिसतात. सोयाबीनच्या भरलेल्या शेंगा, कपाशीची कोवळी बोंड आणि कोवळ्या तुरीचे शेंडे फस्त करतात. नीलगाई एवढ्या चतुर आहेत की झटका मशीनच्या शेतात उडी मारुन शिरताना दिसल्याचे अनेकांनी बघितले आहे.
 
 
यासंदर्भात वन विभाग व कृषी अधिकार्‍यांनी उपाययोजना करुन शेतकर्‍यांना दिलासा देण्याची गरज आहे. या श्वापदांच्या धुडगुसांमुळे अनेक पिकांची नासडी देखील होत आहे. त्यामुळे वनविभागाने तातडीने या प्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकर्‍यांकडून केली जात आहे.