१९ वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार

लोहमार्ग पोलिसात गुन्हा, पाच जणांना अटक

    दिनांक :26-Sep-2026
Total Views |
वर्धा,
gang-rape येथील रेल्वे स्थानक परिसरातील तिकीट घराजवळून मुलीला ऑटोमध्ये नेऊन सामूहिक अत्याचार केल्याची घटना गुरुवार २४ रोजी रात्री समोर आली. बुधवारी रात्रीच्या सुमारास पीडित मुलगी सेवाग्राम रेल्वे स्थानकावरून वर्धा रेल्वे स्थानक परिसरात आली होती. दरम्यान, रात्री दीड वाजता तिला पाच जणांनी ऑटोमध्ये बसवून निर्जनस्थळी नेत हे कृत्य केले. याप्रकरणी रेल्वे लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून पाच जणांना अटक करण्यात आली आहे. विक्रम उर्फ गोलू खंडाळे (२८) रा. आर्वी नाका, इंदिरानगर वर्धा, मोहसिन शेख कासम शेख (२१) गजानननगर पिपरी मेघे, शेख साहील शेख शरीफ (३०) रा. राममंदिर, महादेवपुरा गोलबाजार वर्धा, रजत बावणे (२०) रा. मांगपुरा, गोंडप्लॉट आणि एक अल्पवयीन अशी आरोपींची नावे आहेत.
 
 
gang-rape
 
नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुयातील एका गावातील १९ वर्षीय मुलीला चंद्रपूरला तिच्या नातेवाईकांकडे जाण्यासाठी वडिलांनी मंगळवारी सकाळी सोनेगाव (बेला) येथील बस स्थानकावर घेऊन आले. त्यानंतर चंद्रपूरकडे जाणार्‍या बसमध्ये बसवून दिले होते. नातेवाईकांकडे मुकाम झाल्यानंतर मुलीने बुधवारी रात्री चंद्रपूरवरून रेल्वे गाडीने वर्धेकरिता येण्यासाठी प्रवास केला. सेवाग्राम रेल्वे स्थानकावर बुधवारी मध्यरात्री दीड वाजता उतरल्यानंतर तिने ऑटोने वर्धा रेल्वे स्थानक गाठले. वर्धा रेल्वे स्थानकावर आल्यानंतर संशयित युवकाने मदतीच्या नावाखाली तिला ऑटोमध्ये बसविले आणि पाच सहकार्‍यांना सोबतीला घेऊन निर्जन स्थळी नेले. तेथे मुलीवर सामूहिक अत्याचार केला. रेल्वे लोहमार्ग पोलिसांना एका मुलीवर अत्याचार झाल्याची गोपनीय माहिती गुरुवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास मिळताच पोलिसांनी तिचा शोध घेणे सुरू केला.
 
 
गुरुवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास पीडिता शहरात फिरताना रेल्वे पोलिसांना आढळली. मुलीला विचारपूस केल्यानंतर तिच्या वडिलांना बोलावून घेण्यात आले. संशयितांची ओळख पटविण्यासाठी १० संशयितांना चौकशीकरिता आणले असता त्यातील ५ जणांची ओळख पटली. या प्रकरणी लोहामार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल करून पाच जणांना अटक केली. त्यापैकी एक अल्पवयीन असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
 
 
आरोपींना तीन दिवसांची पोलिस कोठडी
पोलिसांनी तपासाची चक्र फिरवित १० संशयितांना ताब्यात घेतले होते. त्यापैकी पीडित मुलीने पाच जणांची ओळख पटविल्याने त्यांना अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. दरम्यान, पोलिसांनी शुक्रवारी आरोपींना घटनास्थळावर नेऊन चौकशी केली.