ऐतिहासिक मस्कऱ्या गणपतीचे २७ सप्टेंबरला आगमन

२९ सप्टेंबरला स्थापना; यंदा २३९ वर्षांची परंपरा

    दिनांक :26-Sep-2026
Total Views |
नागपूर,
Historic Maskarya Ganpati शहरातील ऐतिहासिक मस्कऱ्या पारंपरिक गणपती उत्सवाचे यंदाचे २३९ वे वर्ष असून, गणपतीचे आगमन रविवार, २७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता होणार आहे. गणपतीची स्थापना २९ सप्टेंबर रोजी करण्यात येणार आहे.

maskarya
 
इ.स. १७८७ मध्ये श्रीमंत राजे खंडोजी महाराज भोंसले यांनी मस्कऱ्या गणपती उत्सवाची सुरुवात केल्याचे सांगितले जाते. बंगाल स्वारीत विजय मिळवून परतल्यानंतर विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी या उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. विविध नकला, खडी गंमत आदी पारंपरिक कार्यक्रमांद्वारे हा उत्सव सार्वजनिक स्वरूपात साजरा करण्यात आला.
पितृपक्षात सुरू झालेली ही परंपरा आजही कायम असून, श्रीमंत राजे मुधोजी महाराज भोंसले यांच्या मार्गदर्शनाखाली व महाराजा ऑफ नागपूर ट्रस्टच्या व्यवस्थापनात उत्सवाचे आयोजन करण्यात येते. ऐतिहासिक परंपरेनुसार यंदा १८ हातांची सात फूट उंचीची गणेशमूर्ती स्थापित केली जाणार आहे. हा गणपती नवसाला पावणारा असल्याची भाविकांची श्रद्धा असून, अनेक भक्तांना त्याची प्रचिती आल्याचे आयोजकांचे म्हणणे आहे.
गणपतीची आगमन मिरवणूक सी.पी. अँड बेरार महाविद्यालय, तुळशीबाग येथून सुरू होऊन ज्युनियर भोंसला पॅलेस, राजे प्रतापसिंह भोंसले चौक (सुतिकागृह), कोतवाली पोलीस स्टेशन चौक, नरसिंग टॉकीज चौक मार्गे सीनियर भोंसला पॅलेस येथे पोहोचेल.