यूएनमध्ये पाकिस्तानला भारताचा सडेतोड प्रतिवाद

यूएनमध्ये पेटल गहलोत यांचा पलटवार**

    दिनांक :26-Sep-2026
Total Views |
न्यूयॉर्क,
india pakistan unga संयुक्त राष्ट्र महासभेच्या (UNGA) व्यासपीठावर पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी केलेल्या भाषणानंतर भारताने ‘राइट ऑफ रिप्लाय’च्या माध्यमातून पाकिस्तानच्या भूमिकेला प्रत्युत्तर दिले. संयुक्त राष्ट्रातील भारताच्या स्थायी मिशनच्या फर्स्ट सेक्रेटरी पेटल गहलोत यांनी दहशतवाद, धार्मिक असहिष्णुता, लोकशाही अधिकार आणि जम्मू-कश्मीरच्या मुद्द्यावर पाकिस्तानच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले.शहबाज शरीफ यांनी आपल्या भाषणात पुन्हा एकदा काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर भारताकडून भूमिका मांडताना पेटल गहलोत यांनी पाकिस्तानच्या दाव्यांवर टीका केली. दरवर्षी एकच खोटा दावा पुन्हा पुन्हा केल्याने तो सत्य ठरत नाही, अशा आशयाची भूमिका त्यांनी मांडली.
 
 
india pakistan unga
 
 
पेटल गहलोत यांनी आपल्या निवेदनात 9/11 दहशतवादी हल्ल्याचाही संदर्भ दिला. न्यूयॉर्कसह जगभरात या हल्ल्याच्या 25व्या वर्षपूर्तीनिमित्त स्मरण करण्यात आल्याचा उल्लेख करत त्यांनी ओसामा बिन लादेन पाकिस्तानमधील प्रमुख लष्करी अकादमीजवळ वास्तव्यास असल्याचा मुद्दा उपस्थित केला. पाकिस्तानच्या प्रतिनिधींनी ज्या संस्थेचे कौतुक केले, त्याच पाकिस्तानी लष्करी संस्थेशी संबंधित हा संदर्भ असल्याचे त्यांनी नमूद केले.पाकिस्तानच्या लोकशाही व्यवस्थेबाबतही भारताने प्रश्न उपस्थित केले. पेटल गहलोत यांनी पाकिस्तानमधील लोकशाही अधिकार आणि मानवी मूल्यांबाबतच्या दाव्यांवर टीका केली. पाकिस्तानच्या 27व्या घटनादुरुस्तीचा तसेच देशातील ‘वास्तविक सत्ताधाऱ्यांना’ देण्यात आलेल्या आजीवन सवलतीचा त्यांनी उल्लेख केला.
धार्मिक सहिष्णुतेच्या मुद्द्यावरही भारताने पाकिस्तानला लक्ष्य केले. पाकिस्तानमधील धार्मिक असहिष्णुता आणि अल्पसंख्याकांच्या स्थितीचा संदर्भ देताना गहलोत यांनी ईशनिंदा कायद्यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला. पाकिस्तानकडून सुरक्षा आणि धार्मिक सहिष्णुतेबाबत करण्यात येणाऱ्या दाव्यांमध्ये आणि प्रत्यक्ष परिस्थितीत फरक असल्याचा आरोप त्यांनी केला.जम्मू-कश्मीरच्या मुद्द्यावर भारताने आपली भूमिका पुन्हा स्पष्ट केली. जम्मू-कश्मीर हा भारताचा अभिन्न आणि अविभाज्य भाग आहे आणि कायम राहील, असे पेटल गहलोत यांनी सांगितले. काश्मीरचा उल्लेख करायचा असेल तर पाकिस्तानच्या ताब्यातील जम्मू-कश्मीरमधील परिस्थितीवरही चर्चा झाली पाहिजे, असे त्यांनी नमूद केले. रावलकोटमधील नागरिकांना कथित हिंसाचार आणि मूलभूत अधिकारांच्या प्रश्नांना सामोरे जावे लागत असल्याचा उल्लेखही त्यांनी केला.
सीमापार दहशतवादाचा मुद्दाही भारताच्या उत्तराचा केंद्रबिंदू राहिला. पाकिस्तानकडून दीर्घकाळ सीमापार दहशतवादाला प्रोत्साहन दिले जात असल्याचा आरोप भारताने केला.india pakistan unga दहशतवादापासून देशाचे संरक्षण करण्याचा भारताचा अधिकार कायम राहील आणि पाकिस्तानकडून होणाऱ्या दहशतवादी कारवायांचे परिणाम होतील, अशी भूमिका गहलोत यांनी मांडली. यापूर्वी पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी संयुक्त राष्ट्र महासभेत जवळपास 23 मिनिटांचे भाषण केले होते. शुक्रवारी झालेल्या या भाषणात त्यांनी 2025 मध्ये झालेल्या भारत-पाकिस्तान संघर्षाचा उल्लेख केला. या संघर्षाच्या काळात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या हस्तक्षेपाबद्दल शरीफ यांनी त्यांचे आभार मानले.