महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त तालुक्यांची यादी...तुमचा तालुका कोणता?

    दिनांक :26-Sep-2026
Total Views |
मुंबई,
List of drought-affected talukas फडणवीस सरकारने आज एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेत संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर केला आहे. ट्रिगर १ लागू झाल्यानंतर जाहीर झालेल्या या निर्णयानुसार, राज्यातील एकूण ३५८ पैकी तब्बल २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला आहे. यामुळे महाराष्ट्रातील सुमारे ७५ टक्के शेतकऱ्यांना सरकारकडून थेट मदत मिळणार असून, या घोषणेमुळे शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे. सरकारने दुष्काळग्रस्त तालुक्यांची सविस्तर यादी जाहीर केली असून, याद्वारे शेतकरी आपल्या तालुक्याचे नाव तपासून पाहू शकतात. लातूरमध्ये भीषण दुष्काळामुळे व्यथा सांगताना एक शेतकरी मुख्यमंत्र्यांना मिठी मारून ढसाढसा रडल्याची हृदयद्रावक घटनाही समोर आली आहे.या सर्वसमावेशक यादीमध्ये कोणत्या जिल्ह्यात किती तालुके समाविष्ट आहेत, याची सविस्तर आकडेवारी समोर आली आहे. यामध्ये रायगडमधील १, रत्नागिरीमधील ३, सिंधुदुर्गमधील ८, नाशिकमधील १०, धुळ्यामधील ४, जळगावमधील १५, नंदुरबारमधील ६, अहिल्यानगरमधील १४, पुण्यातील ८, सोलापुरातील ११, सांगलीतील ४, अकोल्यातील ७, वाशिममधील ६, यवतमाळमधील १६, वर्ध्यातील ७, नागपूरमधील १४, भंडाऱ्यातील ३, गोंदियातील १, चंद्रपूरमधील १२ आणि गडचिरोलीमधील २ तालुक्यांचा समावेश आहे.
 
 
 
45645767
 
विभागीय आणि जिल्हानिहाय विचार केल्यास, कोकण विभागातील ठाणे (ठाणे, कल्याण, अंबरनाथ, भिवंडी, शहापूर, उल्हासनगर, मुरबाड - ७ तालुके), पालघर (पालघर, वसई, वाडा, जव्हार, मोखाडा, डहाणू, तलासरी, विक्रमगड - ८ तालुके), रायगड (अलिबाग, पनवेल, पेण, कर्जत, खालापूर, उरण, सुधागड, माणगाव, रोहा, मुरूड, म्हसळा, महाड, पोलादपूर, तळा - १४ तालुके), रत्नागिरी (मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण, गुहागर, लांजा - ६ तालुके), सिंधुदुर्ग (सगळे ८ तालुके) आणि मुंबई उपनगर (अंधेरी, बोरिवली, कुर्ला - ३ प्रशासकीय तालुके) यांचा समावेश आहे. पुणे विभागातील पुणे (हवेली, मुळशी, भोर, मावळ, जुन्नर, आंबेगाव - ६ तालुके), सांगली (शिराळा, वाळवा, तासगाव, खानापूर, पलूस, कडेगाव - ६ तालुके), सातारा (कराड, वाई, कोरेगाव, पाटण, जावळी - ५ तालुके), कोल्हापूर (करवीर, कागल, शिरोळ, हातकणंगले, गगनबावडा, शाहूवाडी - ६ तालुके) आणि सोलापूर (सगळे ११ तालुके) दुष्काळग्रस्त वलयात आले आहेत.
 
 
नाशिक विभागातील नाशिक (नाशिक, चांदवड, निफाड, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी - ५ तालुके), धुळे (सगळे ४ तालुके), जळगाव (सगळे १५ तालुके), नंदुरबार (सगळे ६ तालुके) आणि अहिल्यानगर (सगळे १४ तालुके) यांचा समावेश आहे. छत्रपती संभाजीनगर विभागातील नांदेड (माहूर, धर्माबाद - २ तालुके) आणि परभणी (बसमत - १ तालुका) यांसह छ. संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव आणि हिंगोली जिल्ह्यांतील चडशे सगळे तालुके या २६५ दुष्काळग्रस्त वलयांमध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. तसेच नागपूर विभागातील वर्धा (कारंजा - १ तालुका), भंडारा (साकोली, तुमसर, मोहाडी, लाखनी - ४ तालुके), गोंदिया (गोंदिया, अर्जुनी-मोरगाव, आमगाव, सडक-अर्जुनी, सालेकसा, गोरेगाव, देवरी - ७ तालुके), चंद्रपूर (भद्रावती, राजूरा, बल्लारपूर, जिवती - ४ तालुके) आणि गडचिरोली (अहेरी, आरमोरी, सिरोंचा, एटापल्ली, कोरची, कुरखेडा, धानोरा, देसाईगंज, भामरागड, मुलचेरा - १० तालुके) मधील तालुक्यांचा यादीत समावेश आहे.