विषारी दारूने १९ जणांचा मृत्यू

चौकशीसाठी विशेष तपास पथकाची स्थापना

    दिनांक :26-Sep-2026
Total Views |
नागालँड
nagaland poisonous liquor नागालँडमधून धक्कादायक घटना समोर आली असून, कथितरीत्या भेसळयुक्त आणि विषारी दारूचे सेवन केल्याने किमान १९ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. या घटनेनंतर संबंधित गावांमध्ये शोककळा पसरली असून, मृतांच्या नातेवाइकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील दोन दिवसांत वेगवेगळ्या जिल्ह्यांत या मृत्यूंची नोंद झाली आहे. मोकोकचुंग जिल्ह्यात आठ, तर तुएनसांग जिल्ह्यात ११ जणांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
 

nagaland poisonous liquor deaths: 19 dead after allegedly consuming spurious alcohol 
कथितरीत्या बेकायदा दारूचे सेवन केल्यामुळे हे मृत्यू झाल्याचा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून, प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. मृत्यूमागील नेमके कारण तसेच संबंधित दारूचा स्रोत आणि तिच्या पुरवठ्याची साखळी शोधण्याच्या दृष्टीने तपास केला जात आहे.या प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधीक्षक (SSP) वेसुप्रा केझो यांनी शनिवारी माहिती देताना सांगितले की, घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथकाची (SIT) स्थापना करण्यात आली आहे. अतिरिक्त पोलीस अधीक्षक (ASP) आय. बुंगलांग चांग यांच्या नेतृत्वाखाली हे पथक काम करणार आहे. कथित भेसळयुक्त दारू कुठून आली आणि तिचा पुरवठा कोणामार्फत करण्यात आला, याचा शोध SIT घेणार आहे. या घटनेत सहभागी असलेल्या आरोपींविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
नागालँडमध्ये १९९० पासून nagaland poisonous liquor  दारूबंदी लागू आहे. असे असतानाही कथित विषारी दारूमुळे झालेल्या या मृत्यूच्या घटनेने दारूबंदीची अंमलबजावणी आणि बेकायदा दारूच्या उपलब्धतेबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. दारूबंदी असतानाही विषारी दारू संबंधित भागात कशा पद्धतीने विकली किंवा पोहोचवली जात होती, याचा तपास आता पोलिसांकडून केला जात आहे.