कांगोमध्ये विमान अपघात; १४ जणांचा मृत्यू

    दिनांक :26-Sep-2026
Total Views |
काँगो प्रजासत्ताक,
Plane crash in Congo कांगोमध्ये घडलेल्या एका भीषण विमान अपघातात लष्कराच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांसह कमीत कमी १४ जणांचा बळी गेला आहे. काँगोच्या लष्कराने शुक्रवारी या दुर्घटनेची अधिकृत माहिती दिली. या अपघातात प्राण गमावणाऱ्यांमध्ये लेफ्टनंट जनरल मुतोम्बो कातालायी तिएंदे आणि लेफ्टनंट जनरल बाकुमी लिकुलिया या दोन वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यापैकी तिएंदे हे लष्करी न्यायालयाचे प्रमुख होते, तर लिकुलिया हे सशस्त्र दलाचे ऑडिटर जनरल म्हणून महत्त्वाची जबाबदारी सांभाळत होते.
 
 
 
झंस्व ३ ४ ५
 
काँगोच्या लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल एफोमी एकेंगे यांनी एका निवेदनाद्वारे याबद्दल माहिती देताना स्पष्ट केले की, दोन्ही जनरल अधिकाऱ्यांव्यतिरिक्त या दुर्घटनेमध्ये त्यांच्या शिष्टमंडळातील १२ सदस्य आणि विमानाचे चालक दल यानी क्रू मेंबर देखील मृत्यूमुखी पडले आहेत. लष्कराच्या या अधिकृत निवेदनानुसार या विमान प्रवासात विमानात उपस्थित असलेल्या कोणत्याही व्यक्तीचा जीव वाचू शकलेला नाही.
 
स्थानिक प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, हे विमान दक्षिण-पश्चिम कांगोमधील किक्विट शहरातून देशाची राजधानी असलेल्या किंशासा येथे परतत होते. याच दरम्यान उड्डाणादरम्यान विमानात अचानक तांत्रिक बिघाड निर्माण झाला आणि विमान केंगे परिसrात कोसळून दुर्घटनाग्रस्त झाले. या अपघातानंतर लष्कराचे प्रवक्ते एफोमी एकेंगे यांनी सांगितले की, या दुर्घटनेमागील नेमक्या कारणाचा शोध घेण्यासाठी सखोल चौकशीचे काम सुरू करण्यात आले आहे. तसेच, काँगोच्या नागरी उड्डयन प्राधिकरणाच्या बोर्डाचे अध्यक्ष ट्रायफॉन किन-कीए मुलुंबा यांनी देखील दुजोरा दिला आहे की, सध्या तरी या विमान अपघाताची नेमकी तांत्रिक किंवा इतर कारणे अद्याप पूर्णपणे स्पष्ट झालेली नाहीत.