भंडारा,
Three talukas in Bhandara are drought-affected राज्य शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळी तालुक्यांमध्ये भंडारा जिल्ह्यातील 3 तालुक्यांचा समावेश आहे. त्यामुळे आता या ठिकाणी शासनाच्या विविध उपायोजना आणि सवलतींचा लाभ शेतकऱ्यांना होणार आहे. भंडारा जिल्ह्यातील भंडारा, पवनी आणि लाखांदूर या तालुक्यांचा दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये समावेश आहे. उर्वरित मोहाडी, तुमसर, लाखनी, साकोली दुष्काळग्रस्तांच्या यादीत नसल्याने येथील शेतकऱ्यांना विशेष सवलतींचा लाभ मिळणार नाही. याही तालुक्यांमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना कोरड्या दुष्काळाचा सामना करावा लागला असल्याने या भागातील लोकप्रतिनिधी आता आपल्या शेतकऱ्यांचा आवाज शासन दरबारी कसा मांडतात, यावर बरेच काही अवलंबून आहे.