मुंबई
vicky kaushal संजय लीला भन्साळी यांच्या बहुप्रतिक्षित ‘लव्ह अँड वॉर’ या चित्रपटाची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत आहे. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचे फर्स्ट लूक समोर आल्यानंतर आता चित्रपटातील तिसरा प्रमुख अभिनेता विकी कौशल याचा लूकही प्रदर्शित करण्यात आला आहे. विकीच्या या नव्या अवताराची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरू असून त्याचा रफ अँड टफ अंदाज चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
विकी कौशलच्या फर्स्ट लूक पोस्टरमध्ये त्याचा चेहरा गंभीर आणि व्यक्तिमत्त्व इंटेन्स दिसत आहे. ओठांत सिगारेट आणि ती लायटरने पेटवतानाचा त्याचा अंदाज पोस्टरमध्ये पाहायला मिळतो. संपूर्ण लूकमधून रेट्रो वातावरणाची झलक मिळत असून, चित्रपटातील विकीची व्यक्तिरेखा नेमकी कशी असेल, याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. “नजर मिलेंगी, लेकिन हटेंगी नहीं” या ओळींसह विकीचा हा लूक सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.
२१ जानेवारी २०२७ रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित
विकीच्या आधी निर्मात्यांनी रणबीर कपूर vicky kaushal आणि आलिया भट्ट यांचे फर्स्ट लूक पोस्टर प्रदर्शित केले होते. रणबीरच्या पोस्टरमध्ये तो व्हिंटेज कारमध्ये दिसला होता. त्यानंतर आलिया भट्टचा लाल रंगाच्या ड्रेसमधील लूक समोर आला. आता या दोघांनंतर विकी कौशलच्या पोस्टरने चित्रपटाच्या चर्चेला आणखी वेग दिला आहे.‘लव्ह अँड वॉर’ हा चित्रपट बऱ्याच काळापासून चर्चेत आहे. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित या चित्रपटातून रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि विकी कौशल हे तिन्ही कलाकार पहिल्यांदाच एकत्र पडद्यावर दिसणार आहेत. त्यामुळे या त्रिकुटाची ऑनस्क्रीन केमिस्ट्री पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. हा चित्रपट २१ जानेवारी २०२७ रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.दरम्यान, विकी कौशलच्या अलीकडील चित्रपटांपैकी ‘छावा’ विशेष चर्चेत राहिला. फेब्रुवारी २०२५ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात त्याने साकारलेली भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही मोठी कमाई केली असून जगभरात ८०० कोटी रुपयांहून अधिक व्यवसाय केल्याचे वृत्त आहे.आता विकी कौशल ‘महावतार’ या आगामी चित्रपटात भगवान परशुराम यांच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे एकीकडे ‘लव्ह अँड वॉर’मधील त्याचा रफ आणि रेट्रो अंदाज चर्चेत असतानाच दुसरीकडे त्याच्या आगामी पौराणिक भूमिकेकडेही चाहत्यांचे लक्ष लागले आहे.