मालेगाव,
cheque bounce case हातउसने घेतलेल्या रकमेची परतफेड करण्यासाठी दिलेला चेक अनादरित झाल्याच्या प्रकरणात वाशीम येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. बी. ढेंबरे यांनी न्यायालयाने आरोपी रामदास देविदास गाडेकर यास सदर प्रकरणात दोषी ठरवून दोन महिने साधा कारावास आणि फिर्यादीस ४ लाख रुपये नुकसानभरपाई देण्याची शिक्षा सुनावली आहे. नुकसानभरपाई न दिल्यास आरोपीस आणखी दोन महिने साधा कारावास भोगावा लागणार आहे.

फिर्यादी संतोष महादु बोरकर रा. कृष्णा, ता. जि. वाशिम) व आरोपी रामदास देविदास गाडेकर रा. गोंदेगाव, यांच्यात सलोख्याचे संबंध होते. आरोपीने घरगुती व व्यावसायिक कामासाठी फिर्यादीकडे हातउसनी रक्कम मागितल्याने फिर्यादीने जुलै २०१७ मध्ये त्यास २,५०,००० रुपये हात उसने दिले होते. सदर रक्कमेची मागणी करूनही परतफेड न केल्याने शेवटी सदर रकमेच्या परतफेडीसाठी आरोपीने त्याच्या अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, शाखा वाशीमचा २,५०,००० रुपयाचा धनादेश फिर्यादीस दिला. सदर धनादेश फिर्यादीने त्याच्या बँकेत वटविण्यासाठी लावला असता, आरोपीच्या खात्यात पुरेशी रक्कम नसल्यामुळे सदर धनादेश अनादरित झाला.cheque bounce case त्यानंतर फिर्यादीने आरोपीस कायदेशीर नोटीस बजावूनही आरोपीने पैसे न दिल्याने अखेर संतोष बोरकर यांनी न्यायालयामध्ये निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट अॅक्टच्या कलम १३८ अन्वये खटला दाखल केला. सदर प्रकरणात आरोपी हजर होऊन त्याने गुन्हा नाकारला होता. त्यानंतर न्यायालयात संपूर्ण प्रकरण चालले व त्यानंतर न्यायालयाने आरोपीस दोषी ठरविले
फिर्यादीच्या वकिलांचा युक्तिवाद ठरला निर्णायक
सुनावणीदरम्यान फिर्यादीचे वकील ए. पी. गोलेच्छा यांनी विविध सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायनिवाड्यांचा दाखला देत बँकेचे पुरावे, धनादेश आणि कायदेशीर नोटीस याद्वारे गुन्हा सिद्ध करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. आरोपीने उपस्थित केलेले आक्षेप फेटाळून लावले. सादर पुरावे व कागदपत्रे, तसेच युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी रामदास गाडेकर यास दोषी ठरविले व आरोपीस दोन महिने कारावास व ४ लाखांची नुकसानभरपाई देण्याची शिक्षा ठोठावली