वर्धा,
adanis medical group अदानी समूह समाजिक बांधीलकी आणि व्यवसाय एकत्र करत नाही. जिथे सामाजिक बांधीलकी असते तिथे व्यवसाय आणत नाही आणि व्यवसायात सामाजिक बांधीलकी येऊ देत नाही. दत्ता मेघे यांनी उभारलेले विद्यापीठ आणि रुग्णालयातील सेवा, रुग्णालयाची नावं जैसे थे ठेवतच सेवा अधिक दर्जेदार देण्यासाठी अदानी समूह प्रयत्न करीत आहे. वर्धा आणि नागपूर येथील रुग्णालयासाठी प्रत्येकी १०० कोटी रुपयांची तरतूद अदानी समूहानी केली असल्याची माहिती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ललीतभूषण वाघमारे यांनी दिली.
दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशन अॅण्ड रिसर्चला ‘अदाणी इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशन अॅण्ड रिसर्च’ हे नाव देण्यास युजीसीची मंजुरी मिळाल्यानंतर आज २६ रोजी विद्यापीठाच्या कॉन्फरन्स हॉल येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आदनी समुहाचे वर्धेतील सीएसओ रविंद्र मेहेरे, विद्यापीठ सल्लागार डॉ. राजीव बोरले, कुलसचिव डॉ. श्वेता काळे (पिसुळकर), डॉ. सोनाली चौधरी, डॉ. चंद्रशेखर महाकाळकर उपस्थित होते.
डॉ. वाघमारे पुढे म्हणाले की, सावंगी येथील वैद्यकीय विद्यापीठ जागतिक दर्जाचे व्हावे ही दत्ता मेघे यांचीच ईच्छा होती. त्यांनी त्यासाठी प्रयत्नही केले. परंतु, सेंटर फॉर एसेलन्स हा दर्जा प्राप्त करण्यासाठी त्यासाठी आर्थिक निकष होते. त्यात अपुरे पडत असल्याने त्या अडचणी सोडवत विद्यापीठ आणि रुग्णालय अदानीकडे देण्याचा निर्णय झाला. मेघे व अदानी समूह यांच्या परस्पर सामंजस्यातून झाल्याचे त्यांनी सांगितले. हा बदल होत असताना सर्वत्र काही गैरसमज तयार झाले होते. तो दूर करण्यासाठी आम्हाला काळी काळ घालवावा लागणार आहे. येथे विश्वस्त म्हणुन सागर मेघे व राघव मेघे कायम राहणार आहेत एवढेच नव्हे तर महाविद्यालयाची नावंही कायम राहील. तसेच नागपुरात नव्याने सुरू होणार्या दंत महाविद्यालयाला दत्ता मेघे नाव देण्यासही अदानी समुहाने परवानगी दिली असल्याचे त्यांनी सांगितले.
सावंगी व नागपूरच्या वैद्यकीय संस्थेला प्रत्येकी १०० कोटी रुपये पुढील ५ वर्षात देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. सावंगी येथील कर्करोग रुग्णालय ८ मजली बांधल्या जाणार. या ठिकाणी कर्करोगाबाबत जगभरात जे अत्याधुनिक उपचार आहे, ते होतील असा विश्वास त्यांनी व्यत केला.adanis medical group या विद्यापीठाच्या कुलपती म्हणून डॉ. प्रीती गौतम अदानी यांची नियुक्ती झाली आहे. विदर्भातील मुळचे असलेले रविंद्र मेहेरे यांना येथील सीएसओ म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.
तर रविंद्र मेहेरे यांनी या विद्यापीठाच्या माध्यमातून देशभरात १५ नवी वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले. बाजार भावापेक्षा कमी दरात रुग्णांना चांलगी औषधं आणि सेवा देण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. दत्ता मेघे यांनी सुरू केलेल्या सर्व सेवा सुरू ठेवत त्यात वाढ करण्यात येईल. जगातील अत्याधुनिक मशिनरीही येथे उपलब्ध असतील, असे डॉ. वाघमारे यांनी सांगितले.