भाजप नेत्या उषा सिंह यांच्या फॉर्च्युनरला अपघात

    दिनांक :27-Sep-2026
Total Views |
आग्रा

agra-lucknow expressway accident आग्रा-लखनऊ एक्स्प्रेस वेवर मुसळधार पावसामुळे साचलेल्या पाण्यामुळे भाजप नेत्या आणि जिल्हा पंचायत अध्यक्ष उषा सिंह यांच्या फॉर्च्युनर कारला भीषण अपघात झाला. तालग्राम परिसरात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार डिव्हायडरला धडकून दुसऱ्या लेनमध्ये पलटी झाली. या अपघातात उषा सिंह यांच्यासह कारमधील पाच जण जखमी झाले असून, त्यापैकी तिघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. सर्व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
 

agra lucknow expressway accident, usha singh fortuner accident, bjp leader usha singh accident, fortuner overturned on expressway, talgram road accident, agra lucknow expressway rain accident, bjp leader injured in accident, uttar pradesh road accident, heavy rain road accident, usha singh accident news 
मिळालेल्या माहितीनुसार, उषा सिंह या लखनऊहून नोएडाच्या दिशेने फॉर्च्युनर कारने प्रवास करत होत्या. त्यांच्यासोबत आयुष वर्मा, कॉन्स्टेबल अरविंद कुमार, विकास यादव आणि गितांजली सिंह हेही वाहनात होते. तालग्राम परिसरातील आग्रा-लखनऊ एक्स्प्रेस वेवर कार पोहोचली असता मुसळधार पावसामुळे रस्त्यावर पाणी साचले होते. याच पाण्यामुळे चालक विकास यादव यांचा कारवरील ताबा सुटला. त्यानंतर कार डिव्हायडरला धडकली आणि दुसऱ्या लेनमध्ये पलटी झाली.
अपघातानंतर कारमधील पाचही जण वाहनात अडकले होते. त्याच वेळी एक्स्प्रेस वेवरून प्रवास करणारे पोलीस कर्मचारी अमित तेवतिया आणि त्यांची पत्नी अर्चना सिंह यांच्या निदर्शनास हा अपघात आला. त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. कारच्या खिडक्या फोडून त्यांनी वाहनात अडकलेल्या जखमींना बाहेर काढले.
यानंतर सर्व जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या दुर्घटनेत पाचही जण जखमी झाले असून, त्यापैकी तिघांना गंभीर दुखापत झाल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातात फॉर्च्युनरचेही मोठे नुकसान झाले आहे. मात्र, अपघातानंतर वेळीच मदत मिळाल्याने मोठा अनर्थ टळला. सध्या सर्व जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.