गुगल क्रोममध्ये AI ची कमाल!

    दिनांक :27-Sep-2026
Total Views |
नवी दिल्ली,
ais-magic-in-google-chrome Google Chrome आता केवळ माहिती शोधण्यासाठी किंवा वेबसाइट्स पाहण्यासाठी मर्यादित राहणार नसून विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठीही अधिक उपयुक्त ठरणार आहे. Google ने Chrome मध्ये विद्यार्थ्यांसाठी काही नवीन फीचर्स आणले आहेत. AI च्या मदतीने व्हिडिओ आणि ऑडिओमधील माहिती समजून घेणे, उघडलेल्या टॅबमधील अभ्याससामग्रीवर आधारित Interactive Quiz तयार करणे आणि वेगवेगळ्या डिव्हाइसवर सुरू असलेले काम त्याच ठिकाणाहून पुढे सुरू करणे शक्य होणार आहे. Chrome मधील Gemini आता YouTube व्यतिरिक्त इतर प्लॅटफॉर्मवरील Podcast, वेबसाइटवरील व्हिडिओ आणि Lecture Recordings समजून घेऊ शकते. डेस्कटॉपवर कंटेंट सुरू केल्यानंतर Gemini त्यातील विशिष्ट माहिती शोधणे, महत्त्वाचे मुद्दे समोर आणणे आणि अवघड भाग समजावून सांगण्यास मदत करेल.
 
google-chrome
 
Chrome मधील आणखी एका फीचरच्या मदतीने विद्यार्थ्यांना खुले असलेले Study Material वापरून Interactive Quiz तयार करता येणार आहे. Google Docs मधील Notes, Research Papers किंवा Lecture Videos यांसारख्या सामग्रीतून Chrome महत्त्वाच्या संकल्पना ओळखून त्यावर आधारित Questions तयार करेल. त्यामुळे विद्यार्थी स्वतःची समज किती झाली आहे, हे लगेच तपासू शकतील. हे फीचर सध्या डेस्कटॉपवर इंग्लिश भाषेत US आणि Indiaमध्ये रोल आउट केले जात आहे. Googleच्या माहितीनुसार, येत्या काही महिन्यांत हे फीचर आणखी Regions आणि Mobile Devicesपर्यंत पोहोचवले जाणार आहे. याशिवाय Tab Groupsच्या माध्यमातून वेगवेगळ्या Courses किंवा Projectsशी संबंधित Web Pages एकत्र व्यवस्थित ठेवता येतील. Split Viewमध्ये दोन पेज एकाच वेळी पाहता येतील, तर Paired Tabsमुळे दोन्ही पेज एकत्र ठेवून नंतर त्याच Workspaceवर परत येता येईल.
 
Chrome ने Laptop आणि Phone दरम्यान Tab Transfer ची सुविधाही अधिक प्रभावी केली आहे. एका डिव्हाइसवरून दुसऱ्या डिव्हाइसवर Tab पाठवल्यानंतर त्याची सध्याची स्थिती कायम राहू शकते. यात Pageची Scroll Position तसेच अपूर्ण Formमध्ये भरलेली माहितीही समाविष्ट आहे. त्यामुळे दुसऱ्या डिव्हाइसवर काम सुरू केल्यावर ते पुन्हा सुरुवातीपासून करावे लागणार नाही. Chrome च्या Reading Toolsमु ळे Online Material वाचणेही सोपे होणार आहे. Immersive Reading Mode वेबसाइटवरील अतिरिक्त Visual Elements हटवतो आणि Font, Letter Spacing तसेच Contrastमध्ये बदल करण्याची सुविधा देतो. Chrome Web Pages आवाजात वाचून दाखवू शकते, तर Androidमधील AI Playback फीचर मजकुराचे Podcastसदृश संभाषणात रूपांतर करू शकते. त्यामुळे अभ्यासासाठी Chromeचा वापर करणाऱ्या विद्यार्थ्यांना माहिती समजून घेणे, तिची उजळणी करणे आणि स्वतःची तयारी तपासणे अधिक सोपे होणार आहे.