दिवाळीच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा!

आमदार रवी राणा यांचा बळीराज्याला शब्द

    दिनांक :27-Sep-2026
Total Views |
अमरावती,
Amaravati Loan waiverअमरावती जिल्ह्यामध्ये झालेल्या पावसाने खंड दिल्यामुळे सोयाबीन आणि कापूस पिके 50 टक्के पेक्षा जास्त करपून गेलेत. परिणामी शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. या गंभीर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आमदार रवी राणा आणि अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रवीण तायडे यांनी अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यात प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी दौरा केला आणि दोन्ही आमदारांनी पिकांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतात उतरून नष्ट झालेली सोयाबीन आणि कापूस पिकांची पाहणी केली आणि पिकांच्या नुकसानीचा आढावा घेतला.

loan
 
दरम्यान, यावेळी संपूर्ण अमरावती जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर केल्याने रवी राणा आणि प्रवीण तायडे यांनी राज्य सरकारचे आभार मानले. शेतकऱ्यांची दिवाळी गोड जावी, यासाठी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दिवाळीच्या आधीच मदतीचे पैसे जमा झाले पाहिजेत, यासाठी सरकारकडे तीव्र पाठपुरावा सुरू आहे. कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाऊ दिली जाणार नाही, असा विश्वास आमदारांनी यावेळी दिला.
 
दुसरीकडे, अमरावती जिल्ह्यातील 14 तालुक्यात दुष्काळ जाहीर झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी पंचनाम्याचे आदेश दिले आहे. अमरावती जिल्ह्यात त्रीस्तरीय समिती आता पंचनामे करणार आहेत. या समितीमध्ये तलाठी, कृषी सहायक व ग्रामसेवक यांचा समावेश असून ते गाव पातळीवर पंचनामे करणार आहे. यामध्ये प्रत्येक गावातील पाच प्लॉटमधील नुकसान मोजण्यात येऊन त्याची सरासरी काढण्यात येईल व नुकसानीचे प्रमाण ठरवण्यात येणार आहे. दरम्यान, 50% नुकसान असल्यास ते तीव्र श्रेणीत मोजण्यात येणार असून जिल्ह्यातील पिकांची स्थिती बघता 50 टक्के व नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. यावर्षी अमरावती जिल्ह्यात 6 लाख 39 हजार 140 हेक्टरवर पेरणी झाली असून यामध्ये 2 लाख 5 हजार 296 हेक्‍टरवर सोयाबीन तर 2 लाख 69 हजार 832 हेक्टरवर कापूस तर 1 लाख 12 हजार 299 हेक्टरवर तुर व 40 हजार 474 हेक्टर मक्याची लागवड आहे. तर उर्वरित क्षेत्रात ज्वारी, मुंग उडीद,बाजरी, धान,भुईमूग याचा समावेश आहे.